लय भारी चित्रपटातील नंदिनी आठवतेय का तुम्हाला.... नंदिनीचा तो ग्लॅमरस रोल पडद्यावर साकारला होता, अभिनेत्री आदिती पोहणकर हिने. लय भारी चित्रपटातून आदितीने करिअरची सुरुवात केली आणि तिच्या त्या पहिल्याच ‘डेब्यु’ चित्रपटाची सगळीकडे चांगलीच चर्चा झाली. रितेश देशमुखबरोबर तिला करिअरच्या फर्स्ट सिनेमामध्ये स्क्रीन शेअर करायला मिळाली होती. आदिती पोहनकरचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. या चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीत फारशी दिसली नाही. या चित्रपटानंतर तिने ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून मराठी पडद्यावर कमबॅक केले होते. आता तिचा शी ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र ती इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस व बोल्ड फोटोंमुळे नेहमी चर्चेत येत असते.

आदिती पोहणकर हिने लॉकडाउनमध्ये काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत ती खूपच बोल्ड व सेक्सी दिसत आहे. 

अदिती सध्या बोल्ड फोटोंसोबतच तिच्या नव्या वेबसीरिजमुळे चर्चेत आली आहे. इम्तियाज अली लिखित शी या वेबसीरिजमध्ये आदितीने महिला पोलिसाची भूमिका साकारली आहे. जिचे नाव परदेसी आहे. ती पोलीस दलाच्या मदतीने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याला पकडण्यासाठी वेश्या बनते. 

या भूमिकेबद्दल आदितीने आयएएनएसला सांगितले की, परदेसी ही डरपोक व्यक्ती आहे. जी जीवनात संसारिक गोष्टीत अडकली आहे. ती कामाला जाते व घरी परतते. जेव्हा ती घरी जाते तेव्हा ती कुटुंबासोबत असते. ती वास्तविक जीवन जगत असते. कित्येकदा ती उदास असते. 

ती पुढे म्हणाली की, हे खूप चॅलेजिंग होते. पण सर्व श्रेय इम्तियाज सरांना जाते. त्यांनी खूप चांगला अभ्यास करायला लावले. सोबतच आम्ही खूप चर्चा केली. आरिफ सर व अविनाश सरांमुळे मला कोणताही त्रास झाला नाही. हा खूप अप्रतिम प्रवास होता.

Web Title: Ritesh Deshmukh's actress Aaditi Pohankar shared bold photos on Instagram TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.