बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. तसेच त्याने फिल्म प्रोडक्‍शनमध्येही चांगले यश मिळविले आहे. आता तो तमन्ना भाटियासोबत एका कॉमेडी चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

अभिनेता रितेश देशमुख सध्या एका कॉमेडी चित्रपटाच्या प्रोजेक्‍टवर काम करत असून यात तो मुख्य भूमिका साकारत आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती तो स्वतः करतो आहे.  रितेश आपल्या टीमसह विनोदी चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार असल्याचे समजते आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट तमन्ना भाटियाला आवडली आहे. परंतु अद्याप तिने चित्रपट साइन केलेला नाही.


दरम्यान, रितेश आणि तमन्ना यांनी २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हमशकल्स' चित्रपटात एकत्रित काम केले होते. याशिवाय ही जोडी २०१३ मध्ये एका ऍक्‍शन कॉमेडी 'हिम्मतवाला'मध्येही झळकली होती. आता परत एकदा रितेश आणि तमन्ना यांची कॉमेडी चाहत्यांना पहायला मिळणार आहे.


रितेश देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याने यापूर्वी 'यलो', 'बालक पालक', ' माऊली' आणि 'फास्टर फेणे' यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

आता तो एक कॉमेडी चित्रपटाचे प्रोडक्‍शन करत असून त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझाही यात काम करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Riteish Deshmukh will once again share the screen with the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.