कोरोना व्हायरसने सगळीकडे थैमान मांडले आहे. कित्येकांना या रोगाची लागण होत आहे तर कित्येक जणांचा बळी जात आहे. भारतात हा चौथा लॉकडाउन आहे. सामान्य लोकांसोबतच सेलिब्रेटीदेखील घरात कैद आहेत. यादरम्यान सेलिब्रेटींशी निगडीत काही स्टोरीज व्हायरल होत आहे. असाच एक दीपिका पादुकोणसोनम कपूरचा किस्सा व्हायरल होतो आहे. त्या दोघी रणबीर कपूरबद्दल असं काही बोलल्या होत्या ज्यामुळे त्याचे वडील म्हणजेच अभिनेते ऋषी कपूर भडकले होते.

ऋषी कपूर वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जात होते. कित्येकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत होते. एकदा तर दीपिका पादुुकोण व सोनम कपूरवर इतके भडकले होते की त्यांच्या करियर व क्लासवर सवाल उपस्थित केला होता. खरेतर हे प्रकरण आहे 2010 सालचं. जेव्हा दीपिका पादुकोण व सोनम कपूर या दोघी करण जोहरचा लोकप्रिय टॉक शो कॉफी विद करणमध्ये गेल्या होत्या. या शोमध्ये करणने दीपिकाला विचारले होते की, तू रणबीर कपूरला गिफ्टमध्ये काय देऊ इच्छिते. त्यावर दीपिका म्हणाली होती की, रणबीरला मी एक कंडोमचे पॅकेट गिफ्ट म्हणून देईन. कारण तो त्याचा जास्त वापर करतो. सोबतच दीपिका हेही म्हणाली की, रणबीरने कोणत्यातरी कंडोम कंपनीची जाहिरातीत काम केले पाहिजे.


तर याच शोमध्ये अनिल कपूरची मुलगी सोनमने रणबीरसाठी म्हटले होते की, तो माझा चांगला मित्र आहे. पण मला माहित नाही की, तो एक चांगला बॉयफ्रेंड आहे की नाही. मी रणबीरला काही दिवसांपासून ओळखते आहे. एक मित्र म्हणून माझा अर्थ हा आहे की दीपिका त्याच्यासोबत इतका काळ चांगली राहिली आहे.


ऋषी कपूर सोनम कपूर व दीपिका पादुकोणचे हे बोलणं ऐकून खूप भडकले होते. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, दोघांचे म्हणणं ऐकून ते त्यांचा क्लास दाखवतात. त्या दोघांनी अशा गोष्टींपेक्षा त्यांच्या करियरवर जास्त लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

इतकंच नाही तर ते ही म्हणाले की या शोमध्ये दोघींना त्यांच्या वडिलांच्या कर्तृत्वामुळे बोलवले होते. कारण त्या दोघींनी अद्याप काहीच प्रतिष्ठा मिळवलेली नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rishi Kapoor had shown merit to these two actresses because of 'condoms' TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.