Sushant Singh Rajput Case : सुशांतने केले होता रियाच्या युरोप ट्रिपचा खर्च?, समोर आले हे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 11:43 IST2020-08-27T11:41:57+5:302020-08-27T11:43:44+5:30
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच आपल्यावर लावलेल्यावर आरोपांवर मौन सोडले आहे.

Sushant Singh Rajput Case : सुशांतने केले होता रियाच्या युरोप ट्रिपचा खर्च?, समोर आले हे कारण
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच आपल्यावर लावलेल्यावर आरोपांवर मौन सोडले आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये रियाने अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत. रिपोर्टनुसार रियाने युरोप ट्रिपशी संबंधीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
रियाला विचारण्यात आले की तू सुशांतच्या पैशांवर जगत होतीस का ? यावर ती म्हणाली, मला पॅरिसमध्ये एका फॅशन शोसाठी बोलवलं गेले होते, माझी बिझनेस क्लासची तिकिटदेखील बुक होती. पण सुशांतने सर्व तिकिट कॅन्सल करुन फर्स्ट क्लासची तिकिट्स बूक करुन युरोप ट्रिप प्लान केली. त्याने हॉटेलचे पैसे पण दिले आणि त्याची गर्लफ्रेंड या नात्याने मी सुद्धा कन्फर्टेबल होते. सुशांतला एका स्टारप्रमाणे जगायला आवडायचे. तो 'लिव्ह लाईफ किंग साईज' या मंत्रावर प्रमाणे जगायचा. त्याला जवळच्या लोकांवर पैसे खर्च करायला आवडायचे. आम्ही दोघे कपल सारखे रहायचो आणि मी त्याच्या पैशांवर जगत नव्हते.
रिया चक्रवर्ती म्हणाली की, आम्ही पॅरिसमध्ये लॅंड झालो. त्यानंतर तीन दिवस सुशांत रूममधून बाहेर निघाला नाही. कारण जाण्याआधी तो खूप आनंदी होता. त्याला त्याचा वेगळा अंदाज दाखवायचा होता. पण पॅरिसला पोहोचल्यावर तो रूममधून बाहेरच आला नाही. पण स्वित्झर्लॅंड पोहोचलो तर तो आनंदी होता. इटलीला पोहोचलो तेव्हा आमच्या रूममध्ये एक वेगळंच स्ट्रक्चर होतं. रियाने सांगितले की, रूममध्ये मला भीती वाटत होती. पण सुशांत म्हणाला होता सगळं ठिक आहे. रिया म्हणाली, सुशांत बोलला होता की, इथे काहीतरी आहे. पण मी म्हणाले होते की, हे एक वाईट स्वप्न ठरू शकतं. त्यानंतर सुशांतची हालत बिघडली आणि तो रूममधून बाहेर आलाच नाही.