सलमान खानच्या रिलेशनशीपबाबत झाला खुलासा, म्हणाला - 'आम्ही दोघांनी अजून...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 01:35 PM2021-09-25T13:35:01+5:302021-09-25T13:35:31+5:30

खुद्द सलमान खानने एका कार्यक्रमात त्याच्या रिलेशनशीपबद्दल खुलासा केला.

Revealed about Salman Khan's relationship, said - 'We both still ...' | सलमान खानच्या रिलेशनशीपबाबत झाला खुलासा, म्हणाला - 'आम्ही दोघांनी अजून...'

सलमान खानच्या रिलेशनशीपबाबत झाला खुलासा, म्हणाला - 'आम्ही दोघांनी अजून...'

Next

बॉलिवूडचा दबंग खान सलमान वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत येत असतो. कधी तो आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत येतो तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे. भाईजानचे जगभरात असंख्य चाहते आहेत आणि ते त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. सलमान खानच्या चाहत्यांना त्याच्या रिलेशनशीपबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. बऱ्याचदा त्याचे चाहते त्याच्या लव्ह लाइफबद्दल विचारत असतात. मात्र त्यावेळी सलमान त्याच्या रिलेशनशीपविषयी विनोद करताना दिसतो. आता सलमान खानने त्याच्या सगळ्यात जास्त काळ टिकलेल्या रिलेशनशीपबद्दल सांगितले आहे. त्या दोघांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे त्या दोघांनी अजूनही लग्न केले नाही, असे सलमानने सांगितले.

सलमान खानच्या रिलेशनशीपबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. मात्र सलमान खानने सांगितलेल्या या नावाबद्दल क्वचितच कोणाला माहित असेल. सलमान लवकरच बिग बॉसच्या १५व्या सीझनचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत सलमानने हा खुलासा केला आहे.


सलमान खानने सांगितले की, त्याचे आणि बिग बॉसचे एकमेव असे रिलेशनशीप आहे, जे सर्वात जास्त काळ टिकले आहे. बिग बॉस हे एकमेव असे नाते आहे जे माझ्या आयुष्यात कायम आहे. बिग बॉस आणि माझ्यात असलेले साम्य म्हणजे आम्ही दोघांनीही अद्याप लग्न केलेले नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही भीतीशिवाय स्वतःला बॉस समजतो.


सलमान खान पुढे म्हणाला, बिग बॉससोबतचे माझे नाते कदाचित एकमेव असे आहे जे इतके दिवस टिकले आहे. बिग बॉसने माझ्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात स्थिरता आणली आहे. जरी ४ महिने आम्ही एकमेकांना पाहू शकत नसलो तरीदेखील जेव्हा आम्ही वेगळे होतो म्हणजेच सीझन संपतो तेव्हा आम्हाला पुन्हा भेटण्याची उत्सुकता असते. 


बिग बॉसच्या पंधराव्या सीझनची यंदाची थीम खूप स्पेशल आहे. या शोची थीम जंगलावर आधारीत आहे. 

Web Title: Revealed about Salman Khan's relationship, said - 'We both still ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app