ठळक मुद्देनिकितिन धीर  हाऊसफुल 3, दबंग 2 अशा सिनेमातही झळकला आहे. 

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीचा सुप्रसिद्ध अभिनेता निकितिन धीर पुन्हा एकदा नवा शो घेऊन येतोय.  एकता कपूर व रोहित शेट्टी सारख्या दिग्गज दिग्दर्शक व निर्मात्यांसोबत काम केल्यानंतर निकितिनने वेबसीरिजच्या जगात पाऊल ठेवले आहे. एमएक्स प्लेअरवरच्या ‘रक्तांचल’या ओरिजनल सीरिजमध्ये निकितिन धीर झळकला आहे. या निकितिनला तुम्ही आधीही पाहिले आहेच.

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या ‘जोधा अकबर’ या सिनेमातून निकितिनने त्याच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. या सिनेमात त्याने अकबरचा जीजा शरीफुद्दीन हुसैनची भूमिका साकारली होती. ‘जोधा अकबर’नंतर त्याने विवेक ओबेरॉयच्या ‘मिशन इस्तांबुल’मध्ये काम केले. सलमान खान व असीन स्टारर ‘रेडी’मध्येही तो दिसला. यात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. 

निकितिनने अनेक सिनेमात काम केले असले तरी त्याला खरी ओळख मिळाली ती शाहरूख खान व दीपिका पादुकोण यांच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या सिनेमातून. या सिनेमातचा तंगा बली आठवतो? निकितिनने हीच तंगा बलीची भूमिका जिवंत केली होती.

तंगा बलीच्या भूमिकेसाठी निकितिनने आपली बॉडी बनवली होती. त्याची मस्कुलर बॉडी पाहून अनेक जण हैराण झाले होते. या भूमिकेनंतर निकितिनला तंगा बली याच नावाने अनेक जण ओळखू लागले होते.

निकितिन धीरची आणखी एक ओळख सांगायची झाल्यास तो टीव्ही व बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता पंकज धीरचा मुलगा आहे.   बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत पंकज यांनी कर्णाची भूमिका साकारली होती. याच ‘कर्णा’चा निकितिन हा मुलगा.

निकितिनचे लग्न झालेय. 2014 साली टीव्ही अभिनेत्री कृतिका सेंगरसोबत त्याने लग्नगाठ बांधली होती. कृतिकाने कसौटी जिंदगी की, क्या दिल में है, पुनर्विवाह, कसम तेरे प्यार की अशा मालिकेत काम केलेय.
निकितिन धीर  हाऊसफुल 3, दबंग 2 अशा सिनेमातही झळकला आहे. याशिवाय अनेक तेलगू सिनेमातही त्याने काम केले. निकितिन लवकरच अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’मध्ये झळकणार आहे. काही मालिकांतही त्याने काम केले आहे़.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Remember chennai express Thangabali? nikitin dheer facts profile bollywood career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.