सौंदर्याची राणी, दिलखेचक अदांनी घायाळ करणारी, तरूण अभिनेत्रींना लाजवेल असा उत्साह आणि दिवसागणिक चिरतरूण होणाऱ्या अभिनेत्री म्हणजे बॉलीवूड दिवा रेखा. सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. रेखा यांनी आजवर १८० पेक्षा जास्त सिनेमात काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध् केले आहे. त्यांना त्यांच्या सिने कारकीर्दीत खूप स्ट्रगल करावा लागला होता. रेखा यांच्यासारख्या यशस्वी नायिकांमध्ये फार कमी नायिका असतील ज्यांनी बोल्ड भूमिका साकारल्या असतील.  

कामसूत्र


कामसूत्र चित्रपटात बोल्ड सीन खूप होते. या चित्रपटाला त्यावेळी बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता आणि या सिनेमाची प्रशंसाही झाली होती. हा चित्रपट बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेला. चित्रपटात रेखा यांनी कामसूत्र शिकवणाऱ्या शिक्षिकेची भूमिका केली होती.

उत्सव


१९८४ साली रेखा यांनी उत्सव चित्रपटात मुख्य भूमिका केली होती.या चित्रपटात त्यांनी वसंतसेना नामक रखेलची भूमिका केली होती. ती एका गरीब व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असते. या चित्रपटात शेखर सुमन व रेखा यांचे बोल्ड सीन आहेत.

खून भरी मांग


खून भरी मांग चित्रपटातील रेखा यांच्या भूमिकेनं सर्वांना थक्क केलं होतं. सुंदर रेखा यांचा अर्धा जळलेला चेहरा असलेली भूमिका पाहणं खूपच आव्हानात्मक होतं. तसेच या चित्रपटात ती ग्लॅमरस भूमिकेतही दिसली आहे.

खिलाडियों का खिलाडी


रेखा आणि अक्षय कुमारने खिलाडियों का खिलाडी चित्रपटात एकत्र काम केले होते आणि काही बोल्ड सीनदेखील दिले होते. रेखा यांनी या सिनेमात लेडी डॉनची भूमिका साकारली होती. जी आपल्या बहिणीच्या प्रियकराच्या प्रेमात पडते. 

आस्था


१९९७ साली दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचा चित्रपट आस्था : इन द प्रिजन ऑफ स्प्रिंगमध्ये रेखा यांनी बोल्ड सीन केले होते. या चित्रपटात रेखा यांच्याशिवाय ओम पुरी व नवीन निश्चल होते. या सिनेमात रेखा यांनी ओम पुरी व नवीन निश्चल यांच्यासोबत इंटिमेट सीन दिले होते.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rekha Bold Role Like Kamasutra Teacher To Prostitute In Utsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.