This is a reason why Neha kakkar and himansh kohli had breakup | या कारणामुळे झाले नेहा कक्करचे ब्रेकअप, हिमांश कोहलीच्या या सवयीला कंटाळली होती नेहा
या कारणामुळे झाले नेहा कक्करचे ब्रेकअप, हिमांश कोहलीच्या या सवयीला कंटाळली होती नेहा

ठळक मुद्देहिमांशच्या एका सवयीला नेहा कंटाळली होती आणि त्याचमुळे तिने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचे ठरवले असे म्हटले जात आहे. केवळ संशयामुळे ते दोघे वेगळे झाले अशी चर्चा आहे.नेहा आणि हिमांश यांच्यात इंडियन आयडॉल कार्यक्रमातील एका स्पर्धकामुळे भांडण झाले होते. या स्पर्धकावरून हिमांश नेहावर सतत संशय घेत होता आणि यामुळेच नेहा प्रचंड कंटाळली होती असे म्हटले जाते. 

बॉलिवूडला अनेक हिट गाणी देणारी सिंगर नेहा कक्कड सध्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नेहाचे अभिनेता हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले. नेहा आणि हिमांश गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या चार वर्षांत नेहा हिमांशमध्ये इतकी गुंतली होती की, आता ब्रेकअपनंतर तिला स्वत:ला सांभाळणे कठीण जात आहे. अलीकडे ‘इंडियन आयडॉल 10’च्या सेटवर एका स्पर्धकाचे गाणे ऐकून नेहा इतकी इमोशनल झाली की, चक्क रडू लागली. तिला तिच्या भावना रोखता आल्या नाहीत. यानंतर नेहाने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिून आपले दु:ख बोलून दाखवले होते. पण आता हळूहळू नेहा या सगळ्यातून बाहेर पडू इच्छिते. 

नेहा आणि हिमांश कोहली यांचे ब्रेकअप का झाले याबाबत या दोघांनाही मौन बाळगणे पसंत केले आहे. पण या दोघांच्या ब्रेकअपचे खरे कारण काय आहे हे नुकतेच समोर आले आहे. हिमांशच्या एका सवयीला नेहा कंटाळली होती आणि त्याचमुळे तिने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचे ठरवले असे म्हटले जात आहे. केवळ संशयामुळे ते दोघे वेगळे झाले अशी चर्चा आहे. नेहा आणि हिमांश यांच्यात इंडियन आयडॉल कार्यक्रमातील एका स्पर्धकामुळे भांडण झाले होते. या स्पर्धकावरून हिमांश नेहावर सतत संशय घेत होता आणि यामुळेच नेहा प्रचंड कंटाळली होती असे म्हटले जाते. 

नेहा आणि हिमांश कोहलीच्या ब्रेकअपची चर्चा सध्या सगळीकडेच रंगली आहे. त्या दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. इतकेच नव्हे तर नेहाने हिमांश सोबत असलेले तिचे फोटो देखील इन्स्टाग्रामवरून डिलीट केले आहे. 

‘इंडियन आयडॉल 10’मध्ये ‘शादी स्पेशल’ भागात या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी नेहाला आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी हिमांशला आमंत्रित केले होते. आपल्या प्रिय व्यक्तीला पाहून नेहाचा आनंद गगनात मावत नव्हता आणि ती वेड्यासारखी हसत होती. माझ्यासाठी हिमांश फक्त मित्र नाही तर त्यापेक्षा जास्त आहे. जगात हिमांश इतक्या चांगल्याप्रकारे तिला अन्य कोणी समजून घेत नाही आणि ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार आहे, असे तिने त्यावेळी सांगितले होते. मी त्याच्या चित्रपटासाठी ‘आज ब्लू है पानी पानी’ हे गीत म्हटले होते, त्यावेळी मी हिमांशला सर्वप्रथम भेटले होते. त्या दिवसापासून आमचा झालेला हा प्रवास खूप सुंदर होता, ज्याच्या अनेक गोड आठवणी आहेत, असे नेहा यावेळी म्हणाली होती. 

Web Title: This is a reason why Neha kakkar and himansh kohli had breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.