स्टाईल, झनकार बीट्स आणि अपना सपना मनी मनी या सिनेमातून अभिनेत्री रिया सेननं रसिकांची मनं जिकली असूनही तिला हव्या तशा बॉलिवूड ऑफर मिळाल्या नाहीत. करियरच्या सुरुवातीपासूनच रियाकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या. रियाला सेक्सी भूमिकांचा वीट आला होता. त्यामुळेच अशा भूमिका मला नको असंच जाहीर करुन टाकलं होते. 

सेक्सी या शब्दाचा अर्थच नेमका काय हे आजवर कुणालाच कळला नाही असं रियाला वाटतं. हिंदी सिनेमा दिग्दर्शकांना वाटतं की आपण कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं. मात्र या सगळ्या गोष्टींना सेक्सी म्हणत नाहीत असं रियाला वाटतं. सेक्सी म्हणजे एखाद्या व्यक्तीची पर्सनालिटी. आपल्याला कुणीही सेक्सी म्हटलं तर आवडेल. मात्र तरीही बॉलीवुडच्या सिनेमात काम करताना फार मजा आली नसल्याचं रियाला वाटतं. त्यामुळेच तिने आपला मोर्चा इतर भाषिक सिनेमाकडे वळवला. बंगाली दिग्दर्शकांनी आपल्याला चांगल्या भूमिका ऑफर केल्या. त्या भूमिकांमध्ये काही तरी वेगळं सांगण्यासारखं होतं. केवळ लोकांना सेक्सी आवडतं म्हणून कमी कपड्यात मला दाखवणं असं त्यांनी काही केलं नाही. 

 डोकं नसलेली एक अभिनेत्री अशी माझी जी प्रतिमा निर्माण झाली आहे ती आता बदलायची आहे असंही रियानं सांगितलं होते. हेच सिद्ध करण्यासाठी मला बंगाली सिनेमांनी मोठी मदत केली हे सांगायला ती विसरली नाही. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: for this reason Riya Sen left bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.