'या' कारणामुळे माधुरी दीक्षितने कधीच केले नाही अनिल कपूरसोबत काम, दोघांचाही हा सिनेमा ठरला शेवटचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 06:00 AM2020-09-03T06:00:00+5:302020-09-03T06:00:00+5:30

२००० मध्ये दोघांनी अखेरचे दिग्दर्शक राजकुमार संतोषीच्या ‘पुकार’ या सिनेमात काम केले होते. त्यानंतर थेट १७ वर्षांनंतर ते दोघे 'टोटल धमाल’ सिनेमात एकत्र दिसले होते.

For this Reason Madhuri Dixit Had Made The Distances From Anil Kapoor | 'या' कारणामुळे माधुरी दीक्षितने कधीच केले नाही अनिल कपूरसोबत काम, दोघांचाही हा सिनेमा ठरला शेवटचा

'या' कारणामुळे माधुरी दीक्षितने कधीच केले नाही अनिल कपूरसोबत काम, दोघांचाही हा सिनेमा ठरला शेवटचा

googlenewsNext

बॉलीवुडच्या अभिनेत्रींच्या अफेअर्सच्या चर्चा कायम रंगत असतात. यांत एक्स्ट्रा मॅरिटिअल अफेअर्सचीही अनेक उदाहरणं आहेत. असाच एक किस्सा अनिल  कपूर आणि आणि माधुरी दिक्षित सोबतही घडला होता. एकत्र काम करता करता अनिल आणि माधुरीची जवळीक वाढत असल्याच्या चर्चा रंगायच्या. रोज त्यांच्या दोघांवरही मीडियामध्ये बातम्या यायच्या. शूटिंगवेळीही दोघे एकत्र वेळ घालवत असल्यामुळे मैत्रीपलिकडेही यांच्यात नातं असल्याचे माहिती समोर आली होती. 

अनिल विवाहित असल्याने माधुरीसोबतच्या त्याच्या प्रेमसंबंधाची बातमी पत्नी सुनीता कपूर यांच्याही कानावर गेली. एक दिवस सुनीताने सत्य जाणून घेण्यासाठी मुलांनासह सिनेमाच्या शूटिंग सेटवर पोहोचली. त्यावेळी अनिल त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत असल्याचे माधुरीने पाहिले. हॅप्पी फॅमिली असताना माधुरीचे अनिलसह असलेली जवळीक योग्य नसल्याचे माधुरीच्या लक्षात आले.

तिच्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण होऊ शकते. म्हणून खुद्द माधुरीनेच अनिलमध्ये जास्त गुंतण्याआधीच दूर जाण्याचा निर्णय घेतला. अनिलसोबत सिनेमातही काम करायचे नाही असा निर्धारच तिने केला होता. म्हणूनच सिनेमाच्या ऑफर्स स्विकारण्याआधी सिनेमाचा हिरो कोण याची शहानिशा केल्यानंतरच माधुरीच सिनेमाच्या ऑफर्स स्विकारायची.

२००० मध्ये दोघांनी अखेरचे दिग्दर्शक राजकुमार संतोषीच्या ‘पुकार’ या सिनेमात काम केले होते. त्यानंतर थेट  १७ वर्षांनंतर ते दोघे 'टोटल धमाल’ सिनेमात एकत्र दिसले होते.  १९९९ मध्ये अमेरिकेतील सर्जन डॉ श्रीराम नेनेशी लग्न केले.लग्नानंतर माधुरीही बॉलिवूडपासून लांब जात अमेरिकेतच स्थायिक झाली होती.  दहा वर्ष अमेरिकेत घालवल्यानंतर माधुरी पुन्हा भारतात आली.  २००७ मध्ये ‘आजा नचले’ या सिनेमातून तिने दमदार कमबॅक केले होते.

Web Title: For this Reason Madhuri Dixit Had Made The Distances From Anil Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.