the reason behind shelving of inshallah is to be katrina kaif | OMG! ‘इंशाअल्लाह’ बंद होण्यामागे कतरीना कैफचा हात, वाचा सविस्तर

OMG! ‘इंशाअल्लाह’ बंद होण्यामागे कतरीना कैफचा हात, वाचा सविस्तर

ठळक मुद्देसलमान आणि भन्साळी यांनी या आधी ‘खामोशी’ आणि ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटांमध्ये सोबत काम केले होते.

संजय लीला भन्साळी आणि सलमान खान ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटासाठी 20 वर्षांनी पुन्हा एकत्र येणार असल्याची बातमी आली आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढली. सलमानसोबत आलिया भट दिसणार म्हटल्यावर चाहत्यांची ही उत्सुकता शिगेला पोहोचली. पण अचानक चाहत्यांचा हिरमोड झाला. काहीही ध्यानीमनी नसताना ‘इंशाअल्लाह’ बंद पडल्याची बातमी आली. आता इतक्या दिवसांनंतर ‘इंशाअल्लाह’ बंद का झाला, यामागचे खरे कारण समोर आले आहे. होय, यामागचे कारण आहे, कतरीना कैफ.

होय, चित्रपट समीक्षक राजीव मसंद याने ‘ओपन मॅगजीन’ मध्ये लिहिलेल्या एका स्तंभात याबाबत खुलासा केला आहे. त्यानुसार, सलमानला ‘इंशाअल्लाह’मध्ये कॅट हवी होती. कॅटच्या नावाचा हट्ट तो धरून बसला होता.   कथासूत्रात काही बदल करून कतरीनासाठी एक नवा ट्रॅक तयार करायचे सलमानचे प्रयत्न होते आणि यासाठी तो भन्साळींवर दबाव टाकत होता. साहजिकच भन्साळींना हे रूचले नाही. सलमान म्हणतो म्हणून कथेत बदल करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. आधी सलमानने त्याची बहीण अर्पिताला या चित्रपटाच्या वेशभूषेची जबाबदारी देण्यात यावी, अशीही मागणी केल्याचे कळते. पण भन्साळींनी सलमानचा कुठलाही हट्ट मानला नाही. त्यापेक्षा ‘इंशाअल्लाह’चा प्रोजेक्ट बंद करण्याची घोषणाच त्यांनी केली.

सलमान आणि भन्साळी यांनी या आधी ‘खामोशी’ आणि ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटांमध्ये सोबत काम केले होते. तर आलिया दोघांसोबतही पहिल्यांदा काम करत होती. या चित्रपटासाठी आलियाने आमिर खान सोबतच्या एका चित्रपटाला नकार दिला होता.

Web Title: the reason behind shelving of inshallah is to be katrina kaif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.