'खिलाडियो को खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार.. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे. त्याचं जीवन सरळ साध्या मार्गाने जगतो. त्याच्या वागण्या, बोलण्यात कुठलाही बडेजावपणा जाणवत नाही. त्याचे प्रत्येक कार्य नियमांद्वारे तो करतो. 


फिटनेस फ्रिक अभिनेता आहे. नित्यनियमाने तो वर्कआऊट करतो. इतकेच नाही तर योग्य आहार घेणे,  रात्री लवकर झोपण्याची आणि नंतर सकाळी लवकर उठण्याची सवय त्याने स्वतःला लावली आहे. काहीही झाले तरी अक्षय त्याच्या डेली रूटीनमध्ये कुठेही अडथळा निर्माण होऊ देत नाही. आपल्या कामावरील प्रेम,जिद्द आणि मेहनतीमुळे अक्षयने नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कोणतंही काम करताना तो त्याच उत्साहाने तो काम करतो.. त्यामुळं आजवर जीवनात कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही.

अक्षय कुमार बॉलिवूड पार्ट्यांमध्येही कधीच भाग घेत नाही यामागेही खास कारण आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये अक्षयने या गोष्टींचा पहिल्यांदा खुलासा केला होता. शो दरम्यान कपिल शर्मा अक्षयला विचारतो की इतर कलाकांराप्रमाणे कधीच लेट नाईट पार्ट्यांमध्ये जात नाही  कारण तुम्हालाही कधीतरी त्याला पार्टी देऊन खर्च करावा लागेल. यामुळेच पार्टीला जाणे तु टाळतोस हे खरे आहे का? यावर अक्षय कुमार हसतो आणि विनाकारण खर्च करणे मला आवडत नाही म्हणून मी अशा पार्ट्यांना जाणेच टाळतो असे सांगत त्याने उपस्थितांचेही मनोरंजन केले होते.


तसेच कॉफी विथ करण शोमध्ये त्याने याच प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले होते की, 'मला माझी झोप खूप आवडते. मला रात्री लवकर झोपायला आवडते आणि नंतर सकाळी लवकर उठणे आवडते. जे मला पार्टीत बोलवतात त्यांना माहित आहे की मी लवकर जास्त वेळ पार्टी एन्जॉय करू शकणार नाही. त्यामुळे तेही मला आता बोलवत नाहीत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: For This Reason Akshay Kumar Doesnt Attend Bollywood Parties Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.