Real To Reel Vidya Balan's hard work for Shankut's biopic, trailer to come tomorrow | Real To Reel शंकुतला बायोपिकसाठी विद्या बालनने घेतली अशी मेहनत, उद्या ट्रेलर येणार भेटीला

Real To Reel शंकुतला बायोपिकसाठी विद्या बालनने घेतली अशी मेहनत, उद्या ट्रेलर येणार भेटीला

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित आगामी बायोपिक शंकुतला देवीचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांची भूमिका वास्तविक साकारण्यासाठी विद्याने खूप मेहमत घेतली आहे.

विद्या बालनचा आगामी सिनेमा शकुंतला देवीचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले असून या मोशन पोस्टरद्वारे या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे ट्रेलर 15 जुलैला प्रदर्शित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. कॅलक्युलेटरहून वेगवान असा ह्यूमन-कंप्यूटर अशी ओळख असणाऱ्या गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या प्रगल्भ भूमिकेत विद्या बालन दिसणार आहे. या आगामी बायोपिकच्या निमित्ताने याआधी कधीच न पाहिला गेलेल्या असा या गणितज्ज्ञांचा प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.  

या चित्रपटाचे दिग्दर्शन वेटिंग, फोर मोर शॉट्स प्लीज़ सीजन 1 चे दिग्दर्शक अनु मेनन यांनी केले असून याची निर्मिती सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रोडक्शन्स आणि विक्रम मल्होत्रा (अबुंदंतिया एंटरटेनमेंट) द्वारे करण्यात आली आहे. ‘शंकुतला देवी’ चित्रपटामध्‍ये अभिनेत्री सान्‍या मल्‍होत्रा शंकुतला देवीच्‍या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. शंकुतला देवीचे तिच्‍या मुलीसोबत जटिल, पण असाधारण नाते होते. तसेच या चित्रपटामध्‍ये जीशू सेनगुप्‍ता आणि अमित साध हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. अनु मेनन व नयनिका महतानी यांनी पटकथा लेखन केले असून इशिता मोएत्राने संवाद लेखन केले आहे.


या चित्रपटाचा प्रीमिअर 31 जुलैला अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पहायला मिळणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Real To Reel Vidya Balan's hard work for Shankut's biopic, trailer to come tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.