ravi shastri clarifies his on relationship with nimrat kaur | म्हणे,‘या’ सगळ्या अफवा! निमरत कौरसोबतच्या अफेअरच्या बातम्यांवर रवी शास्त्री भडकले!!
म्हणे,‘या’ सगळ्या अफवा! निमरत कौरसोबतच्या अफेअरच्या बातम्यांवर रवी शास्त्री भडकले!!

अभिनेत्री निमरत कौरसोबतच्या अफेअरच्या बातमीवर इंडियन क्रिकेट टीमचे कोच रवी शास्त्री चांगलेच भडकले. ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या बातम्यांवर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. अनेकांनी शेण खात या अफवा पसरवल्या. या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असा खुलासा त्यांनी केला.
काल निमरतनेही या बातम्यांवर आपले मौन तोडत सोशल मीडियावर ट्विट केलं होत. माझ्याबदद्ल सकाळपासून पसरवल्या जात असलेल्या बातम्या निव्वळ कपोलकल्पित आहेत, या बातम्या प्रचंड वेदनादायी आहेत, अशा आशयाचे ट्विट तिने केले होते.
निमरत पाठोपाठ रवी शास्त्रींच्या खुलाशानंतर या कथित अफेअरच्या बातम्यांना पूर्णविराम मिळतो की यापश्चात हे सीक्रेट प्रकरण आणखी काही वेगळे वळण घेतो, हे बघूच.

 पुणे मिररने दिलेल्या वृत्तनुसार, गेल्या दोन वर्षांपासून रवी शास्त्री आणि निमरत कौर कथितरित्या एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या दोन वर्षांत दोघांनीही याची या कानाची त्या कानाला खबर होऊ दिली नव्हती.  आत्तापर्यंत दोघेही सार्वजनिक जीवनात फारसे एकत्र दिसले नाहीत.   २०१५ पासून अनेकदा ही जोडी एका जर्मन कारच्या लॉन्च इव्हेंटमध्ये दिसली आहे. येथूनचं दोघांची लव्हस्टोरी लॉन्च झाली.

English summary :
According to the report given by Pune Mirror, Ravi Shastri and Bollywood Actress Nimrat Kaur have reportedly been dating each other for the past two years. In the last two years.


Web Title: ravi shastri clarifies his on relationship with nimrat kaur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.