अखेर रवी शास्त्रींसोबतच्या अफेअरवर निमरत कौरने सोडले मौन...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 07:12 PM2018-09-03T19:12:35+5:302018-09-03T19:13:47+5:30

 रवी शास्त्री आणि निमरत कौर दोघेही गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त व्हायरल झाले आणि सगळीकडे हीच चर्चा रंगली.

nimrat kaur speaks on her link up rumors with indian cricket team coach ravi shastri | अखेर रवी शास्त्रींसोबतच्या अफेअरवर निमरत कौरने सोडले मौन...!

अखेर रवी शास्त्रींसोबतच्या अफेअरवर निमरत कौरने सोडले मौन...!

googlenewsNext

आज सकाळपासून टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री आणि अभिनेत्री निमरत कौर यांच्या अफेअरची चर्चा रंगतेय. रवी शास्त्री आणि निमरत कौर दोघेही गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त व्हायरल झाले आणि सगळीकडे हीच चर्चा रंगली. बॉलिवूडचं नाही क्रिकेटप्रेमींनीही यावर भल्या-बुऱ्या प्रतिक्रिया दिल्या. पण कदाचित या प्रतिक्रिया वाचून निमरतने धसका घेतला आणि यावर खुलासा करणेचं योग्य समजले. होय, रवी शास्त्रींसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडत निमरने एक ट्विट केले आहे.




‘फॅक्ट- मला रूट कॅनॉलची गरजपडू शकते. आज माझ्याबद्दल जे काही छापून आलेय ते सगळे फिक्शन आहे. आणखी काही सांगायचे तर फिक्शन बरेच त्रासदायक असू शकते,’ असे ट्विट निमरतने केले आहे. निमरतचे ट्विट लक्षपूर्वक वाचल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला कळेल, ती म्हणजे, रवी शास्त्रीसोबत तिचे काहीही नाही, हे तिने सांगायचा प्रयत्न केला आहे. तिच्याबद्दलच्या सगळ्या बातम्या या अफवा आहेत, असे ती सांगतेय.  निमरतने तर आपली बाजू स्पष्ट केली. आता रवी शास्त्री यांच्या प्रत्युत्तराची प्रतीक्षा असेल.

 पुणे मिररने दिलेल्या वृत्तनुसार, गेल्या दोन वर्षांपासून रवी शास्त्री आणि निमरत कौर कथितरित्या एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या दोन वर्षांत दोघांनीही याची या कानाची त्या कानाला खबर होऊ दिली नव्हती.  आत्तापर्यंत दोघेही सार्वजनिक जीवनात फारसे एकत्र दिसले नाहीत.   २०१५ पासून अनेकदा ही जोडी एका जर्मन कारच्या लॉन्च इव्हेंटमध्ये दिसली आहे. येथूनचं दोघांची लव्हस्टोरी लॉन्च झाली.

Web Title: nimrat kaur speaks on her link up rumors with indian cricket team coach ravi shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.