Raveena Tandon was going to get married to Akshay Kumar. The incident at a party caused a breakup | अक्षय कुमारसोबत रवीना टंडन करणार होती लग्न, एका पार्टीत घडलेल्या या घटनेमुळे त्यांचे झाले ब्रेकअप

अक्षय कुमारसोबत रवीना टंडन करणार होती लग्न, एका पार्टीत घडलेल्या या घटनेमुळे त्यांचे झाले ब्रेकअप

अभिनेता अक्षय कुमार आज बॉलिवूडमधील सर्वात महागडा कलाकार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार एका चित्रपटासाठी जवळपास १२० कोटी रुपये मानधन घेतो. अक्षय कुमार फक्त प्रोफेशनल लाइफच नाही तर खासगी लाइफमुळे चर्चेत आला आहे. अक्षय कुमारचे नाव रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टीसोबत जोडले गेले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार आणि रवीना टंडन एकेकाळी सीरियस रिलेशनशीपमध्ये होते. असे सांगितले जात होते की दोघांनी साखरपुडादेखील केला होता. अक्षय कुमारचे म्हणणे होते की, रवीनाने लग्नानंतर चित्रपटात काम करायचे नाही आणि असेही सांगितले जाते की अक्षयच्या प्रेमात रवीना आकंठ बुडाली होती. त्यामुळे तिने अक्षय म्हणणे मान्यदेखील केले. मात्र अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्या दोघांच्या नात्यात कटुता आली होती.


असेही रवीनासोबत सीरियस रिलेशनशीपमध्ये असतानाही अक्षय आणि रेखा यांच्यात जवळीकता वाढू लागली होती. खरेतर अक्षय, रवीना आणि रेखाने खिलाडियों के खिलाडी चित्रपटात काम केले होते. या चित्रपटादरम्यान अक्षय कुमार आणि रेखा यांच्यात जवळीकता वाढू लागली होती.

एकदा रवीनाने उशीरा रात्री एका पार्टीत अक्षय आणि रेखाला एकत्र पाहिले होते. त्यानंतर रवीनाने अक्षयसोबत ब्रेकअप केले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Raveena Tandon was going to get married to Akshay Kumar. The incident at a party caused a breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.