रवीना टंडनचा नातवासोबत खेळतानाचा 'क्युट' व्हिडीओ व्हायरल, दिल जीत लिया...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 04:34 PM2021-03-31T16:34:07+5:302021-03-31T16:46:14+5:30

अभिनेत्री रवीना टंडनचा तिच्या नातवाबरोबर खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Raveena tandon playing with grandson rudra is the cutest thing on the internet | रवीना टंडनचा नातवासोबत खेळतानाचा 'क्युट' व्हिडीओ व्हायरल, दिल जीत लिया...

रवीना टंडनचा नातवासोबत खेळतानाचा 'क्युट' व्हिडीओ व्हायरल, दिल जीत लिया...

googlenewsNext

अभिनेत्री रवीना टंडनचा तिच्या नातवाबरोबर खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना रवीना ग्लॅमरस आजी म्हणून आवडली आहे.  रवीना 2019 मध्ये आजी झाली आहे.  रवीना टंडनची दत्तक मुलगी छायाने एका मुलाला जन्म दिला होता.


 रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.  अभिनेत्रीचा हा व्हिडिओ काही दिवस जुना असला तरी या व्हिडिओमध्ये ग्लॅमरस आजी रवीना आणि नातू रुद्रचा क्युट व्हिडिओ पाहून चाहत्यांनी लाईकचा वर्षाव केला आहे. निवांत क्षणांमध्ये रवीना कधी आपल्या नातवाला खेळवत असते तर कधी ती त्याचे लाड  करताना दिसते.  रवीनाने 1995 मध्ये दोन मुली दत्तक घेतल्या होत्या.

छाया आणि पूजा ही त्यांची नावे. त्यावेळी पूजाचे वय 11 वर्षं होते तर छाया आठ वर्षांची होती. रवीना टंडनने या दोन्ही मुली वाढवल्या आणि त्यांचे लग्न केले. 22 फेब्रुवारी 2004 रोजी रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसेबत लग्न केले. या दोघांना 14 वर्षांची मुलगी राशा आणि 11 वर्षांचा मुलगा आहे. रवीनाने अनेक हिट चित्रपट दिले असून तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. मोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या.

Web Title: Raveena tandon playing with grandson rudra is the cutest thing on the internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.