ठळक मुद्दे‘83’ या सिनेमात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिका साकारणार आहे.

एनर्जी,मस्ती आणि एंटरटेनमेंटचा पॉवर पॅक म्हणजे रणवीर सिंग. होय, पडद्यावरच्या आपल्या फर्स्ट क्लास अदाकारीने रणवीरने लाखो चाहत्यांची मने जिंकलीत. चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या याच रणवीरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. होय, या व्हिडीओत रणवीर त्याच्या को-स्टारसोबत लिपलॉक करताना दिसतोय.
रणवीरने सोशल मीडियावर हा लाईव्ह व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्याच्या ‘83’ या आगामी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्टही हजर होती.

बोलता बोलता मस्तीत रणवीर त्याचा सहकलाकार जतिनला किस करतो आणि सगळी टीम एकच गलका करते. यानंतर रणवीर फोन हातात घेत, तुमची वहिणी (दीपिका पादुकोण) लाईव्हवर सगळे बघतेय. हे काय सुरु आहे? असे म्हणतो.  सध्या रणवीरचा हा मजेशीर व्हिडीओ सगळीकडे तुफान व्हायरल होतोय.


रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास सध्या तो ‘83’ मध्ये बिझी आहे. यानंतर तो ‘जयेशभाई जोरदार’ या सिनेमात झळकणार आहे. 


‘83’ या सिनेमात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिका साकारणार आहे. लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. ‘83’ हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: ranveer singh kisses 83 costar jatin sarna on live video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.