ठळक मुद्देआगामी चित्रपटाविषयी बोलायचे तर, ही जोडी पुन्हा एकदा ‘83’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे.

दीपिका पादुकोणरणवीर सिंग यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. दोघांनीही तीर्थक्षेत्रांना भेटी देत लग्नाचा वाढदिवस साजरा केला. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे जोडपे नुकतेच एका मुलाखतीसाठी पोहोचले. इथेही त्यांच्या प्रेमाला भरते आले. मग काय दोघांनी असे काही केले की ‘हे सगळे इथे नको’ म्हणत, होस्टला मध्यस्थी करावी लागली.
फिल्म कंपेनियनच्या एका मुलाखतीत दीपिका, रणवीर, आलिया भट, आयुष्यमान खुराणा, मनोज वाजपेयी, विजय देवरकोंडा असे सगळे स्टार्स होते. अनुपमा चोप्रा ही या इव्हेंटची होस्ट होती. अनुपमाने विचारलेल्या प्रश्नावर आलिया भट काहीतरी बोलत होती. अशात रणवीरने दीपिकाकडे बघत, तिच्या खांद्यावर किस केले.

 

रणवीरचे हे वागणे बघून   होस्ट अनुपमाने ‘मैंने कहा था न, नो पीडीए’ (पीडीए म्हणजे पब्लिक डिसप्ले ऑफ अफेक्शन)असे म्हणत त्वरित त्यांना रोखले. यावर दीपिका खळखळून हसू लागली. तर आयुष्यमानने ‘ये तो बहुत ही मुश्किल है,’अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. मग काय, सगळेच हसायला लागले.


लग्नाच्या  6 वर्षे आधीपासून दीपिका व रणवीर रिलेशनशिपमध्ये होते. गोलियों की रासलीला: रामलीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी  या चित्रपटांमध्ये या जोडप्याने एकत्र भूमिका साकारल्या आहेत. आगामी चित्रपटाविषयी बोलायचे तर, ही जोडी पुन्हा एकदा ‘83’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. हा आगामी सिनेमा सन 1983 साली भारताने जिंकलेल्या विश्वचषकाच्या विजयी गाथेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर सिंह कपिल देवची भूमिका साकारताना दिसणार आहे.  

Web Title: ranveer singh kissed deepika padukone at interview host interrupt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.