ठळक मुद्देदीपिका व रणवीरला एकमेकांच्या जवळ आणण्यात भन्साळींची सर्वात मोठी भूमिका होती.

दीपवीर अर्थात दीपिका पादुकोणरणवीर सिंग यांच्या लग्नाला आज एक वर्षे पूर्ण झाले.  बॉलिवूडचे हे कपल आज लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर गतवर्षी 14 नोव्हेंबरला दीपवीरने लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. या शाही लग्नाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. दीपवीरची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी लव्हस्टोरीपेक्षा कमी नव्हती. ही लव्हस्टोरी सुरु झाली ती ‘गोलियों की रासलीला रामलीला’ या सिनेमाच्या सेटवर.

होय, संजय लीला भन्साळींच्या ‘गोलियों की रासलीला रामलीला’ या चित्रपटात दीपिका व रणवीर दोघेही मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाच्या सेटवर दीपवीर एकमेकांत असे काही गुंतले की, जगाचे भान विसरले. चित्रपटातील रोमॅन्टिक सीन देताना त्यांच्या डोळ्यांतील एकमेकांबद्दलचे प्रेम सर्वप्रथम लोकांच्या नजरेत भरले.

सेटवरच्या क्रू मेंबर्सनी लगेच दीपवीर एकमेकांच्या प्रेमात असल्याचे ओळखले. सेटवरचे अनेक रंजक किस्से यानंतर ऐकवले जाऊ लागले. ‘गोलियों की रासलीला रामलीला’चे रोमॅन्टिक सीन्स देताना दीपवीर एकमेकांत असे काही गुंतून जात की, भन्साळींनी कट म्हटल्यावरही ते यातून बाहेर पडत नसत.

एका क्रू मेंबरने  सेटवरचा एक किस्सा ऐकवला होता. ‘दीपवीरचे नाते मैत्रीपलीकडे गेल्याचे आम्हाला वाटत होते. ‘अंग लगा दे रे’ या गाण्याच्या वेळी मात्र आम्हाला दीपवीर एकमेकांच्या प्रेमात असल्याचे कन्फर्म झाले. या गाण्यात एक किसींग सीन होता. तो पॅशनेट किसींग सीन मी कधीच विसरू शकत नाही. दीपिका आणि रणवीर हा सीन देताना एकमेकांत इतके हरवले होते की, भन्साळींनी कट म्हटल्यावरही ते दोघे एकमेकांना किस करत राहिले. त्यावेळी दीपवीर प्रेमात असल्याची आमची खात्री पटली’,असे या क्रू मेंबरने सांगितले होते.


  
रणवीरने दीपिकाला पहिल्यांदा एका अवार्ड फंक्शनमध्ये पाहिले होते. पहिल्याच नजरेत रणवीर दीपिकाच्या प्रेमात पडला होता. पण पुढे हे दोघे सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आलेत आणि दीपिकाही रणवीरच्या प्रेमात पडली.

दीपिका व रणवीरला एकमेकांच्या जवळ आणण्यात भन्साळींची सर्वात मोठी भूमिका होती. कारण भन्साळींच्या एक नाही तर तीन चित्रपटांत दीपवीरने एकत्र काम केले. एकत्र काम करता करता त्यांचे प्रेम बहरले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ranveer singh deepika padukone wedding anniversary when they continue kissing after cut in shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.