कबीर खान दिग्दर्शित 83 सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. रणवीर सिंग सिनेमातील फर्स्ट लूक आऊट झाल्यावर सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या सिनेमासाठी रणवीर सिंगने प्रचंड मेहनत घेतली आहे. सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे अनेक किस्से कबीर खानने सांगितले. 

आजतकच्या रिपोर्टनुसार शूटिंग दरम्यान रणवीर सिंग भावूक होऊन जायचा.कबीरने सांगितले लंडनच्या लॉर्ड्स  स्टेडिअमवर आम्ही जवळपास पाच दिवस शूटिंग केले. त्यावेळी आम्ही स्टेडिअमचे ड्रेसिंग रुपमापसून लॉकर रुमचा उपयोग केला. ज्या पद्धतीने वर्ल्डकप जिंकल्यानतंर कपिल देव यांनी बाल्कनीत जाऊन वर्ल्ड कपला प्रेजेंट केले होते सेम तसेच आम्ही रणवीरसोबत शूट केले आहे.

सिनेमाच्या शेवटच्या सीन खऱ्या वर्ल्डकपसोबत संपला. या सीन दरम्यान रणवीर सिंग रडला होता.  रणवीर सिंग हा असा अभिनेता आहे जो प्रत्येक भूमिका जगतो. त्याने कपिल देव यांची भूमिका अतिशय सक्षमपणे साकारली आहे.  कपिल देव यांची मुलगी अमिया या सिनेमाची असिस्टेंट डिरेक्टर आहे तिला सुद्धा जे थोडसे वेगळे वाटले. 

या सिनेमात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिका साकारणार आहे. लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. हा सिनेमा १० एप्रिल २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Ranveer singh broke down on the sets of film 83 reveals director kabir khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.