आता रानू मंडलनं गायलं मुलीसोबत गाणं, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 06:43 PM2019-09-09T18:43:06+5:302019-09-09T18:43:24+5:30

रानू मंडल व तिची मुलगी एलिजाबेथचा गाण्याचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ranu Mondal Sung A Song With Her Daughter Elizabeth Sathi Roy | आता रानू मंडलनं गायलं मुलीसोबत गाणं, व्हिडिओ होतोय व्हायरल

आता रानू मंडलनं गायलं मुलीसोबत गाणं, व्हिडिओ होतोय व्हायरल

googlenewsNext

एका गाण्यामुळे एका रात्रीत लोकप्रिय झालेल्या रानू मंडलचं आयुष्यच बदलून गेलंय. रानू यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचं एका रात्रीत इतकं जीवन बदलेल. रानू मंडल स्टेशनवर लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' गाणं गात होती, त्यावेळी एतींद्र चक्रवर्ती नामक व्यक्तीनं व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि तिला हिमेश रेशमियाने आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली. तर, तब्बल १०वर्षांपासून दूर असलेली तीची मुलगीही परतली. त्यानंतर आता त्या दोघींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एकमेकींना साथ देत गायलेल्या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.


एलिजाबेथ आणि रानू यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात दोघी 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे' हे गाणं गाताना दिसत आहेत. 


आईच्या भेटीबाबत बोलताना साती रॉयने स्पष्टीकरण दिले आहे. मी स्वत: घटस्फोटीत असून माझंही आयुष्य दु:ख आणि वेदनांनी भरलेलं आहे. माझी आई रानू डिप्रेशनचा शिकार बनली होती. त्यानंतर, आईने घर सोडून दिले होते.

वडिलांच्या मृत्यूनंतर आई माझ्यासोबत 7 ते 8 वर्षांपासून राहत होती. मात्र, डिप्रेशनचा शिकार झाल्यामुळे ती कुटुंबीयांसमेवत राहत नसे. त्यामुळे आईने स्वत:च घर सोडले होते. त्यानंतर, आईचा आणि माझा संपर्कच झाला नाही.

अनेकदा नातेवाईक आईबद्दल माहिती द्यायचे. या ठिकाणी, त्या ठिकाणी आईला पाहिल्याचं ते सांगत. मात्र, माझ्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींमुळे मी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं साती यांनी म्हटलं आहे.

आईच्या आवाजाला मिळालेला प्रतिसाद हे तिच्या दुसऱ्या आयुष्याचा जन्म असल्याचंही मुलगी साती रॉय यांनी म्हटलं आहे.

Web Title: Ranu Mondal Sung A Song With Her Daughter Elizabeth Sathi Roy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.