राणी मुखर्जीने सोडले सासऱ्यांचे घर, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 11:40 AM2019-07-14T11:40:38+5:302019-07-14T11:41:41+5:30

लाइमलाइटपासून दूर राहणारी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि तिचा पती आदित्य चोप्रा सध्या एका खास कारणाने चर्चेत आहेत. होय,  राणी आणि आदित्य यांनी यश चोप्रा यांचे घर सोडल्याचे कळतेय.

rani mukherjee aditya chopra leave yash chopras home |  राणी मुखर्जीने सोडले सासऱ्यांचे घर, हे आहे कारण

 राणी मुखर्जीने सोडले सासऱ्यांचे घर, हे आहे कारण

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या राणी यशराज फिल्मच्या ‘मदार्नी 2’ च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात राणी  शिवानी शिवाजी रॉय या महिला पोलीस अधिका-याची भूमिका साकारणार आहे.

लाइमलाइटपासून दूर राहणारी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि तिचा पती आदित्य चोप्रा सध्या एका खास कारणाने चर्चेत आहेत. होय,  राणी आणि आदित्य यांनी यश चोप्रा यांचे घर सोडल्याचे कळतेय. दोघेही नव्या घरात शिफ्ट झाले आहेत आणि हे नवे घर यश चोप्रांच्या बंगल्याच्या अगदी शेजारी आहे.
 बॉलिवूड हंगामाने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वीच राणीने त्यांच्या नव्या घरात गृह प्रवेश होता. त्यांचे हे नवे घर यश चोप्रा यांच्या घराच्या अगदी जवळ असल्यामुळे आदित्य आणि राणी त्यांना हवे तेव्हा त्यांच्या जुन्या घरी जाऊ शकतात.

आदित्य व राणी लग्नानंतर जुहू येथे असलेल्या बंगल्यात राहत होते. हा बंगला यश चोप्रा यांचा होता. पण अचानक आदित्य व राणीने नव्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. असे का तर, आदित्यला म्हणे, स्वत:च्या हिमतीवर घर घेऊन संसार थाटायचा होता. या घरात स्वत:च्या अटींवर त्याला व राणीला जगायचे आहे. त्यामुळे त्याने नवे घर घेतले असून तो पत्नी आणि मुलीसह स्वत:च्या घरात शिफ्ट झाला आहे. 

२०१४मध्ये आदित्य व राणीने सीक्रेट मॅरेज केले होते. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय आणि मित्र परिवाराशिवाय कोणालाही आमंत्रण देण्यात आले नव्हते. २०१५मध्ये त्यांची मुलगी आदिराचा जन्म झाला.

सध्या राणी यशराज फिल्मच्या ‘मदार्नी 2’ च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात राणी  शिवानी शिवाजी रॉय या महिला पोलीस अधिका-याची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी राणी ‘हिचकी’ या चित्रपटात दिसली होती.

Web Title: rani mukherjee aditya chopra leave yash chopras home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.