Randeep Hooda First Workout Video Viral After Surgery Fans Says Jaat Is Back Download Amar Ujala App for Breaking News in Hindi & Live Updates. https://www.amarujala.com/channels/downloads?tm_source=text_share | All Is Well सर्जरीनंतर रणदीप हुड्डा पुन्हा सज्ज, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला आनंद

All Is Well सर्जरीनंतर रणदीप हुड्डा पुन्हा सज्ज, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला आनंद

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणदीप हुड्डा सोशल मीडियापासून दूर होता. त्याच्याावर एक मोठी सर्जरी करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये भरती होण्याआधी रणदीप हुड्डाने त्याची कोरोना व्हायरसची टेस्टही करण्यात आली होती.सर्जरीनंतर त्याला काही दिवस विश्रांती करण्यास डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे तो चाहत्यांच्याही संपर्कात नव्हता. आता पुन्हा एकदा रणदीप हुड्डा रसिकांसाठी सज्ज झाला आहे.

सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. व्हिडीओत त्याचे वजनही वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पिळदार बॉडी असलेला रणदीप हुड्डा या व्हिडीओत वेगळाच दिसतोय. सर्जरीनंतर फिट झालेला रणदीपने त्याचा पहिला व्हिडीओ शेअर करत समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रणदीप  कामावर परतणार असल्यामुळे एक वेगळाच आनंद त्याला झाला आहे. या दरम्यान ट्रेनर शेन डिसूजाचेही त्याने आभार मानले आहेत. 

काय सांगता? तीन वर्षे लॉकडाऊनमध्ये होता रणदीप हुड्डा; विश्वास बसत नसेल तर वाचा

फार कमी काळात रणदीपने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. 2001 मध्ये मीरा नायर यांच्या ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे रणदीपने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. पण यानंतर सलग चार वर्षे रणदीपला कुणीही काम देईना. यानंतर 2005 मध्ये रामगोपाल वर्मा यांनी त्याला आपल्या ‘डी’ चित्रपटासाठी साइन केले आणि यानंतर रणदीपने कधीच मागे वळून पाहिले नाही.हाच रणदीप सध्या त्याच्या ‘एक्सट्रेक्शन’ या नेटफ्लिक्स ओरिजनल फिल्ममुळे चर्चेत होता. या चित्रपटात रणदीप हॉलिवूड सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थसोबत अ‍ॅक्शन करताना दिसला. पण त्याआधी काय? तर त्याआधी तीन वर्षे रणदीप म्हणे लॉकडाऊनमध्ये होता. आश्चर्य वाटले ना. पण हे खरे आहे. आम्ही नाही तर खुद्द रणदीपने ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

बॉलिवूडच्या या अभिनेत्याला लागली हॉलिवूडची लॉटरी, वाचा सविस्तर

रणदीप हुड्डा सलमान खानच्या राधे सिनेमात दिसणार आहे. यात तो व्हिलनची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी राधेच्या सेटवर त्याला दुखापत झाली होती. दिशा पटानी या चित्रपटात सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. राधेमध्ये सलमान नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमान खान आणि प्रभूदेवा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Randeep Hooda First Workout Video Viral After Surgery Fans Says Jaat Is Back Download Amar Ujala App for Breaking News in Hindi & Live Updates. https://www.amarujala.com/channels/downloads?tm_source=text_share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.