Randeep hooda excited for his hollywood debut from netflix film extraction gda | बॉलिवूडच्या या अभिनेत्याला लागली हॉलिवूडची लॉटरी, वाचा सविस्तर

बॉलिवूडच्या या अभिनेत्याला लागली हॉलिवूडची लॉटरी, वाचा सविस्तर

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा नेटफ्लिक्स फिल्म 'एक्सट्रेक्शन'मधून हॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. यात रणदीपसोबत क्रिस हेम्सवर्थ काम करणार आहे. हॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची माहिती स्वत: रणदीपने दिली आहे.

 
रणदीपने ट्विट केले आहे, ''मला वाटलं होते की 20 वर्षानंतर मी तिथं काम करण्यासाठी तयार  होईन, अखेर हे झाले. मी सगळ्या क्रू मेंबर्स आणि कलाकारांचा आभारी आहे. हा सिनेमा दमदार अॅक्शन आणि इमोशन्सचा डोस आहे.'' 24 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे.  

View this post on Instagram

रै गाम आलों, सीधी अर सरल बात या सै अक घरां रओ।21 दिन हुक्के, ताश, लफंट गिरी छोड़ कै गीत, रागनी, सांघ, कहानि, चुटकले एक दूसरे नै बताओ।म्हारी लीपी कोन्या तै म्हारी सारी सभ्यता - संस्कृति बात्तां मै ए सै। करल्यो बात मौक़ा पडया है। घरां रहण के जी से लयो अर इस महामारी तै बचो ।। 💪🏽💪🏽💪🏽@narendramodi @mlkhattar #StayHome #StaySafe #IndiaFightsCorona

A post shared by Randeep Hooda (@randeephooda) on


रणदीप हुड्डा सलमान खानच्या राधे सिनेमात दिसणार आहे. यात तो व्हिलनची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी राधेच्या सेटवर त्याला दुखापत झाली होती.   दिशा पटानी या चित्रपटात सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.  राधेमध्ये सलमान नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमान खान आणि प्रभूदेवा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे.सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे. 'राधे' चित्रपट २०२०मध्ये ईदच्या वेळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Randeep hooda excited for his hollywood debut from netflix film extraction gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.