Ranbir kapoor birthday when katrina kaif says ranbir is bad producer but my friend | Ranbir Kapoor Birthday: कतरिना कैफ रणबीर कपूरला म्हणाली होती वाईट निर्माता, यावर अशी होती त्याची रिअ‍ॅक्शन

Ranbir Kapoor Birthday: कतरिना कैफ रणबीर कपूरला म्हणाली होती वाईट निर्माता, यावर अशी होती त्याची रिअ‍ॅक्शन

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आज आपला बर्थ डे सेलिब्रेट करतो आहे. रणबीर कोणत्याना कोणत्या कारणामुळे नेहमी लाईमलाईटमध्ये असतो. कधी तो त्याच्या सिनेमांना घेऊन तर कधी रिलेशनशीपला घेऊन. रणबीरचे नाव कोणत्याना कोणत्या अभिनेत्रीसोबत जोडले जायचे. रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या जोडीने अनेक सिनेमांमध्ये काम एकत्र काम केले आहे. ज्यानंतर त्यांच्या रिलेशनशीपची खूप चर्चा झाली. 

'जग्गा जासूस' सिनेमाची निर्मिती रणबीरने केली
रणबीर कपूरने निर्माता म्हणून जग्गा जासूस सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटाच्या निर्मितीत त्याला बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला होता, त्यामुळे सिनेमा रिलीज होण्यासाठी बराचवेळ गेला. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जेव्हा कतरिना कैफला विचारले गेले की रणबीर एक चांगला निर्माता आहे की मित्र? यावर कतरिनाने जे उत्तर दिले ते ऐकून रणबीर काहीच बोलू शकला नाही. कतरिना म्हणाली, मला नाही वाटत की रणबीर कपूरने निर्माता म्हणून चांगला आहे. तो माझा चांगला मित्र आहे. कतरिनाचे हे बोलणं ऐकून रणबीर यावर काहीच बोलू शकला नव्हता. फक्त तो एवढेच म्हणाला, मी फक्त नावाचा निर्माता आहे कारण तो खूपच आळशी आहे.


रणबीर कतरिना 'अजब प्रेम की गजब काहीनी', 'राजनिति' आणि 'जग्गा जासूस'सारख्या सिनेमात एकत्र दिसले आहेत.  कतरिना आणि रणबीर एकमेकांना पाच वर्षे डेट करत होते त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. मात्र दोघांनी कधीच त्यांचं रिलेशनशीप स्वीकारले नाही. 

आलियासोबत रणबीर अडकणार लग्नाच्याबेडीत
सध्या रणबीर कपूरचे नाव आलिया भटसोबत जोडण्यात आले आहे. दोघे अयान मुखर्जीच्या  'ब्रम्हास्त्र' सिनेमात एकत्र दिसणार आहेत. लवकरच रणबीर-आलिया लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. 

VIRAL VIDEO: बाथरुममध्ये दीपिका असल्याचं समजून फ्लर्ट करू लागला रणबीर कपूर आणि मग घडले असे काही...

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ranbir kapoor birthday when katrina kaif says ranbir is bad producer but my friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.