OMG!! राम गोपाल वर्माचे हॉट अभिनेत्रीसोबत हॉट वर्कआऊट, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 10:59 AM2021-06-18T10:59:55+5:302021-06-18T11:00:33+5:30

राम गोपाल वर्मा सध्या चित्रपटांपेक्षा कमी अन् अभिनेत्रींसोबतच्या फोटोंमुळे अधिक चर्चेत आहेत...

Ram Gopal Varma workout pics with television anchor and Bigg Boss fame Ariyana Glory | OMG!! राम गोपाल वर्माचे हॉट अभिनेत्रीसोबत हॉट वर्कआऊट, फोटो पाहून व्हाल थक्क

OMG!! राम गोपाल वर्माचे हॉट अभिनेत्रीसोबत हॉट वर्कआऊट, फोटो पाहून व्हाल थक्क

Next
ठळक मुद्देराम गोपाल वर्मा यांच्याबद्दल सांगायचे तर येत्या काळात त्यांचे डेंजरस आणि क्लायमॅक्स हे दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्या सिनेमांचा एक खास चाहता वर्ग आहे. आता  राम गोपाल यांच्या फिटनेसचेही चाहते होण्यास तयार असा. होय, कारण आता राम गोपाल वर्मा फिटनेस कोच झाले आहेत. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. विश्वास बसत नसेल तर बातमीसोबतचे फोटो तुम्ही पाहायला हवेत. होय, अर्थात फिटनेस कोच म्हणून वर्मा काही खास लोकांनाच उपलब्ध होणार आहेत. तेलगू अ‍ॅक्ट्रेस व अँकर एरियाना ग्लॉरी (Ariyana Glory ) यापैकीच एक. (Ram Gopal Varma workout pics with  Ariyana Glory )

तेलगू बिग बॉसमध्ये झळकलेल्या एरियानाने राम गोपाल वर्मा यांच्यासोबतचे  वर्क आऊट करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. राम गोपाल वर्मा यांनी देखील तिच्यासोबत वर्कआऊट करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात हॉट एरियानासोबत राम गोपाल वर्मा हॉट वर्कआऊट करताना दिसत आहेत.

या फोटोंसोबत एलियानाने एक खास मॅसेजही दिला आहे. ‘जेव्हा मी काही करते वा बोलते, तेव्हा तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, याने मला फरक पडत नाही. तुम्ही मला उगाच जज करू नका. कारण तुम्ही माझा द्वेष करा वा करू नका, याने मला काहीही फरक पडत नाही. मी फक्त नशिबावर विश्वास ठेवते. मी राम गोपाल वर्मा सरांचे आभारीआहे. एका मुलाखतीने माझे संपूर्ण आयुष्य बदलले,’ असे तिने लिहिले आहे.

या अभिनेत्री ‘बिग बॉस तेलगू’मधून प्रकाशझोतात आली होती. एरियाना ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. टीव्ही होस्ट म्हणून तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल सांगायचे तर येत्या काळात त्यांचे डेंजरस आणि क्लायमॅक्स हे दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.  या चित्रपटानंतर त्यांचा आणखी एक चित्रपट येतोय.
राम गोपाल वर्मांचे हे तीनही चित्रपट बोल्ड आणि इंटिमेट सीन्सनं भरलेले आहेत. त्याची झलक प्रेक्षकांनी ट्रेलरद्वारे पाहिली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ram Gopal Varma workout pics with television anchor and Bigg Boss fame Ariyana Glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app