ठळक मुद्देचित्रपट ‘अग्निचक्र’मधून आपल्या करियरची सुरूवात करणा-या राखीने अनेक हिट आयटम साँग केले आहेत.

राखी सावंतचा एनआरआय पती अद्याप जगासमोर आला नसला तरी, लग्नानंतर सहाच महिन्यात राखी या लग्नाला कंटाळल्याचे मात्र समोर आलेय. होय, ना ना उपद्व्याप करून चर्चेत राहणा-या राखीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनंतर इतक्यात कंटाळली? असा प्रश्न चाहत्यांनी राखीला केला आहे.
राखी सावंतने यावर्षी 28 जुलैला मुंबईच्या जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये गुपचूप लग्न केले. राखीच्या लग्नाचा एकही फोटो समोर आलेला नाही. एवढेच काय, राखीचा हा पती आहे कोण, दिसतो कसा? हेही अद्याप उघड झालेले नाही. केवळ त्याचे नाव रितेश आहे, एवढेच काय ते लोकांना माहित आहे. या लग्नाला उणेपुरे सहा महिने झाले असताना राखीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात राखी तिच्या चाहत्यांना ‘शादी मत करना’ असा सल्ला देताना दिसतेय.


राखीचा हा व्हिडीओ समोर येताच, इतक्या लवकर नव-याला कंटाळली का? असा प्रश्न चाहते राखीला विचारत आहेत. राखीकडून या प्रश्नाचे उत्तर मिळेल, याची अपेक्षा नाही. पण हो, तिचे नवे नवे ड्रामा व्हिडीओ मात्र थांबणारे नाहीत.


चित्रपट ‘अग्निचक्र’मधून आपल्या करियरची सुरूवात करणा-या राखीने अनेक हिट आयटम साँग केले आहेत. नुकतेच तिचे ‘छप्पन छुरी’ हे आयटम साँग प्रदर्शित झाले होते. या गाण्याच्या अनावरणावेळी राखी बोल्ड गेटअपमध्ये आली होती. तिचे या ड्रेसमधील फोटो खूप व्हायरल झाले होते. तूर्तास सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करणे आणि चर्चेत राहणे, एवढेच काय ते ती करताना दिसतेय.

Web Title: is rakhi sawant unhappy in her marriage actress advice shaadi mat karna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.