Rajpal yadav blessed with daughter on the auspicious day of Navratri | या प्रसिद्ध कॉमेडियनच्या घरी झाले नन्ही परीचे आगमन, असे केले हटके स्वागत

या प्रसिद्ध कॉमेडियनच्या घरी झाले नन्ही परीचे आगमन, असे केले हटके स्वागत

राजपाल यादवला नुकतीच मुलगी झाली असून सोशल मीडियाद्वारे त्याने ही गुड न्यूज त्याच्या चाहत्यांना दिली आहे. राजपालने फेसबुकच्या त्याच्या प्रोफाईलवर त्याच्या मोठ्या मुलीचा फोटो पोस्ट करत ही बातमी सगळ्यांना सांगितली आहे. त्याच्या मोठ्या मुलीने बिग सिस्टर असे लिहिलेला टी-शर्ट घालून मी मोठी ताई झाली असल्याचे सगळ्यांना सांगितले आहे. माझी छोटीशी हनी मोठी ताई झाली असून नवरात्रीच्या अतिशय चांगल्या दिवशी माझ्या घरात एका नन्ही परीचे आगमन झाले असे राजपालने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्याच्या या पोस्टवर त्याचे फॅन्स त्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत. 

कॉमिक अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजपालच्या फिल्मी करिअरची सुरुवात १९९९ मध्ये आलेल्या ‘दिल क्या करे’ या चित्रपटातून झाली. चित्रपटात मोठी भूमिका न मिळताही त्याने छोट्या-छोट्या भूमिका साकारून स्वत:ची ओळख निर्माण केली. शिवाय बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान बळकट बनविले.

राजपालची पत्नी राधा त्याच्यापेक्षा जवळपास नऊ वर्षांनी लहान आहे. याबाबतचा खुलासा स्वत: राजपालनेच एका मुलाखतीदरम्यान केला होता. ५.२ फूट एवढी उंची असलेल्या राजपालचे राधाबरोबर लव्ह मॅरेज झाले आहे. त्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘लोकांना असे वाटते की, ती माझ्यापेक्षा खूपच उंच आहे. परंतु वास्तविकता ही आहे की, ती माझ्यापेक्षा केवळ एका इंचाने मोठी आहे. म्हणजेच माझी उंची ५.२ फूट तर तिची उंची ५.३ इंच असल्याचे त्याने सांगितले होते. 

२००२ मध्ये राजपाल त्याच्या ‘द हिरो : लव्ह स्टोरी आॅफ स्पाय’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कॅनडाला गेला होता. त्याठिकाणीच दोघांच्या कॉमन फ्रेंडने त्यांची भेट घडवून आणली होती. दोघांची भेट कॅनडा शहरातील एका कॉफी शॉपमध्ये झाली होती. या भेटीत दोघांनीही एकमेकांच्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफविषयी माहिती शेअर केली. याठिकाणी तब्बल दहा दिवस या दोघांनी एकत्र घालविले. पुढे राजपाल भारतात परतला. मात्र अशातही दोघांमधील प्रेम कायम राहिले. दोघे फोनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. जवळपास दहा महिन्यानंतर राधाने भारतात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. भारतात शिफ्ट झाल्यानंतर १० जून २००३ मध्ये दोघे विवाह बंधनात अडकले. सध्या या दाम्पत्याला दोन मुली आहेत. राजपालची मोठी मुलगी मौनी १३ वर्षांची आहे तर लहान मुलगी हनी तीन वर्षांची आहे. राजपाल नेहमीच त्याच्या मुलींसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत असतो. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rajpal yadav blessed with daughter on the auspicious day of Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.