राज कुंद्रासोबत लग्न करायला तयार नव्हती शिल्पा; पण न पाहताच केलेल्या 'त्या' खरेदीनं विचार बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 10:24 AM2021-07-28T10:24:24+5:302021-07-28T10:27:36+5:30

पॉर्न फिल्म प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्राची जुनी मुलाखत व्हायरल

raj kundra once recalled how shilpa shetty was hesitant about the idea of entering into a romantic relationship | राज कुंद्रासोबत लग्न करायला तयार नव्हती शिल्पा; पण न पाहताच केलेल्या 'त्या' खरेदीनं विचार बदलला

राज कुंद्रासोबत लग्न करायला तयार नव्हती शिल्पा; पण न पाहताच केलेल्या 'त्या' खरेदीनं विचार बदलला

Next

मुंबई: पॉर्न फिल्म प्रकरणामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पत्नी राज कुंद्रा अडचणीत आला. राज कुंद्राच्या विरोधात पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले असून त्यामुळे त्याचा पाय दिवसागणिक आणखी खोलात जात आहे. सक्तवसुली संचलनालयदेखील (ईडी) लवकरच राजची चौकशी करण्याची शक्यता आहे. राज विरोधातील एफआयआरची प्रत मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं कालच ईडीला सोपवली आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरच ईडीची एंट्री होऊ शकते. 

राज कुंद्रा अडचणीत आला असताना त्याची एक मुलाखत पुन्हा व्हायरल झाली आहे. त्यात त्यानं शिल्पा शेट्टीसोबतच्या लव्ह स्टोरीवर भाष्य केलं आहे. शिल्पासोबतची पहिली भेट मॅनेजरच्या माध्यमातून झाली होती. शिल्पानं त्यावेळी यूकेमधील ब्रिग बदर नावाचा रिऍलिटी शो जिंकला होता. हा शो जिंकल्यामुळे शिल्पाच्या लोकप्रियतेमध्ये मोठी वाढ झाली होती.

शिल्पा आपल्यासोबत रोमँटिक रिलेशनमध्ये राहण्यास तयार नव्हती, असं राजनं या मुलाखतीत सांगितलं. 'मला तुझ्याशीच लग्न करायचंय असं शिल्पानं कधीही म्हटलं नाही. शिल्पा माझ्या प्रेमात पडेल असा आशेचा किरण मला एकदा दिसला. त्यानंतर मी हात धुवून तिच्या मागे लागलो. पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही असं तिनं स्पष्ट सांगितलं. मी तिला कारण विचारलं. त्यावर मी मुंबई सोडू शकत नाही आणि तू लंडनला राहतोस, असं उत्तर शिल्पानं दिलं होतं,' असा किस्सा राजनं मुलाखतीत सांगितला.

'शिल्पाला मुंबई सोडायची नव्हती असं तिनं सांगितलं. त्यानंतर मी निर्माता वाशु भगनानींना फोन केला. मला मुंबईत प्रॉपर्टी घ्यायची असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी जुहूमध्ये एक प्रॉपर्टी असल्याचं सांगितलं. मी न बघता ती प्रॉपर्टी विकत घेतली. दहा मिनिटांनी मी शिल्पाला पुन्हा फोन केला. अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर मी घर खरेदी केल्याचं मी शिल्पाला सांगितलं. त्यानंतर तिनं लग्नाला होकार दिला,' असं राजनं मुलाखतीत सांगितलं होतं. २००९ मध्ये शिल्पा आणि राज यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: raj kundra once recalled how shilpa shetty was hesitant about the idea of entering into a romantic relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app