ठळक मुद्देरायजा विल्सनने 2007 साली Velaiilla Pattadhari 2 या चित्रपटातून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता.

सुंदर दिसण्यासाठी सर्जरी करणा-या आणि सर्जरी बिघडल्याने आयुष्यभर पश्चाताप करणारे अनेक जण आपल्या अवतीभवती आहेत. बॉलिवूड, हॉलिवूड, साऊथ इंडस्ट्रीतही अशा अनेक नट्या सापडतील. तामिळ इंडस्ट्रीतील एक अभिनेत्री मात्र डर्मटोलॉजिस्टच्या बळजबरीच्या उपचारांची बळी ठरली आहे. डर्मटोलॉजिस्टने बळजबरीने औषधं दिलीत आणि त्यामुळे माझा चेहरा बिघडला, असा आरोप तिने केला आहे. रायजा विल्सन (Raiza Wilson) असे या अभिनेत्रीचे आहे. (Raiza Wilson’s Skin Treatment Goes Wrong)
रायजा ही लोकप्रिय तामिळ अभिनेत्री आहे. शिवाय बिग बॉस तामिळमध्येही ती दिसलेली आहे.

रायजाने इन्स्टाग्रामवर उपचाराआधीचा आणि उपचारानंतरचा फोटो शेअर करत आपबीती सांगितली. यात तिच्या संपूर्ण चेह-याची अवस्था आपण पाहू शकतो.
रायजाने लिहिले, काल मी सामान्य फेशिअल करण्यासाठी डॉ. भैरवी सेंटहिलकडे गेले होते. तिने मला बळजबरीने चेह-यावर उपचार करण्यासाठी बाध्य केले. मला या उपचारांची गरज नव्हती आणि आता माझ्या चेह-याची ही स्थिती आहे. आता मी त्या डॉक्टरला भेटण्याचा, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतेय. पण तिने भेटण्यास, बोलण्यास नकार दिला आहे. ती शहराबाहेर असल्याचे तिचा स्टाफ सांगत आहे.

इतकेच नाही तर, माझ्या या पोस्टनंतर याच डॉक्टरकडे उपचार घेणा-या व आता भोगणा-या अनेकांचे मला मॅसेज येत आहे. माझ्या इनबॉक्समध्ये मॅसेजचा पूर आला आहे, असा दावा तिने केला आहे.
रायजाने उपचार झालेल्या रूग्णालयालाही आपल्या पोस्टमध्ये टॅग केले आहे.

रायजा विल्सनने 2007 साली Velaiilla Pattadhari 2 या चित्रपटातून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. 2008 साली ‘प्यार प्रेम काधल’ सिनेमात ती लीड रोलमध्ये दिसली होती. यासाठी तिला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवार्डही मिळाला होता. बिग बॉस तामिळमध्येही स्पर्धक म्हणून ती सहभागी झाली होती. लवकरच ती ओटीटीवर डेब्यू करतेय.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Raiza Wilson Beautiful Face Turns Dull After Wrong Treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.