गेल्या काही दिवसांपासून राहुल रॉय 'एल ए सी- लाइव्ह द बॅटल' सिनेमाचे कारगिलमध्ये शूटिंग करत होते. शूटिंग दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. ज्यानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहुलची प्रकृती गंभीर झाल्याने सुरुवातीला त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले होते. राहुल रॉयला प्रोगेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती.राहुल रॉय यांच्यासोबत काम करणारा अभिनेता निशांत मलकानीने वातावरणामुळे हा त्रास झाला असेल जिथे आम्ही शूटिंग करत होतो, तिथले तापमान मायनस १५ डिग्री सेंटीग्रेड होते अशी माहिती दिली होती.

सध्या राहुल रॉय काम करत असलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक नितीनकुमार गुप्ता  उपचाराचा  खर्च उचलत आहेत. राहुल स्वत: सध्याचे बँक खाते ऑपरेट करण्यात सक्षम नाही. नितीन यांनी लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.भविष्यात मेंदूत होणारे नुकसान टाळण्यासाठी त्याला मिडिल सेरिब्रल आर्टरीमध्ये स्टंटची आवश्यकता पडू शकते. या उपचारासाठी खर्चही जास्त आहे. जर कोणालाही काही मदत करायची असेल तर ते माझ्यासाठी अधिक सोपे जाईल. तसेच राहुलच्या परिस्थितीत सुधारणा होताच तो स्वतः सर्व पैस्यांची परतफेड करेल.


1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ या सिनेमाने लोकांना अक्षरश: वेड लावले. यातली गाणीही तुफान गाजली. राहुल रॉय आणि अनु अग्रवाल या जोडीनेही लोकांच्या मनात घर केले. आजही या जोडीला लोक विसरू शकलेले नाहीत, हेच या चित्रपटाचे यश आहे. ‘आशिकी’ने तिला एका रात्रीत स्टार केले आणि नियतीने एकाच रात्रीत तिला बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर केले. एका अपघाताने तिचे अख्खे आयुष्य बदलले.

‘आशिकी’नंतर अनूचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. करियर रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असतानाच 1999 मध्ये तिच्या गाडीला अपघात झाला. १९९९ मध्ये एका रात्री पार्टीहून घरी परतत असताना अनुच्या गाडीला भीषण अपघात झाला. एका कारने तिच्या कारला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, अनु रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. भर रस्त्यात झालेल्या या अपघातानंतरही अनुला कोणी ओळखूही शकले नव्हते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rahul Roy needs financial help for further treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.