बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे हिने अल्पावधीतच सिनेइंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. तिने बदलापूर, मांझी-द माऊंटन मॅन, अंधाधुन व पॅडमॅन व शोर इन द सिटी यांसारख्या चित्रपटात काम करून रसिकांच्या मनात घर केलं आहे. इतकंच नाही तर राधिकानं नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज, सेक्रेड गेम्स व घुलसारख्या वेबसीरिजमधून काम करत प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवली आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राधिका आता अ‍ॅपलच्या नवीन सीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजचं नाव आहे शांताराम. ही सीरिज ग्रेजोरी डेविड रॉबर्ट्स यांच्या कादंबरीवर आधारीत आहे. राधिकासोबत या वेबसीरिजमध्ये रिचार्ड रॉक्सबर्ग आणइ चार्ली हन्नम या हॉलिवूडच्या स्टारसोबत झळकणार आहे. राधिका या सीरिजमध्ये कविताची भूमिका साकारणार आहे. जी भारतीय पत्रकाराची भूमिका साकारणार आहे.


या सीरिजबाबत राधिका खूप उत्सुक आहे. तिने एका वेबसाईटवर आलेल्या बातमीचा फोटो शेअर करत म्हटलं की, अखेर न्यूज शेअर करताना मी खूप उत्साही आहे. 


शांताराम (Shantaram) या सीरिजमध्ये एकूण १० एपिसोड असून यातील दोन भागांचं दिग्दर्शन जस्टीन कुर्झेल करणार आहे. या वेबसीरिजच्या शूटिंगला लवकरच ऑस्ट्रेलियात सुरूवात होणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये भारतात होणार आहे. 


राधिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती द वेडिंग गेस्ट चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता देव पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सध्या राधिका या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटाशिवाय राधिका लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रात अकेली है चित्रपटात झळकणार आहे.

Web Title: Radhika Apte will be featured in the Apple series with the Hollywood star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.