कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडने वाढवला पारा, मालदीवमधील बिकनी फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 03:34 PM2022-01-19T15:34:53+5:302022-01-19T15:35:25+5:30

मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करणाऱ्या पूजा(Pooja Hegde)ने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वत:चा बिकनीमधील फोटो शेअर केला आहे.

Radhe shyam actress pooja hegde bikini look goes viral | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडने वाढवला पारा, मालदीवमधील बिकनी फोटो व्हायरल

कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडने वाढवला पारा, मालदीवमधील बिकनी फोटो व्हायरल

Next

पूजा हेगडे (Pooja Hegde) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा ती तिची सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या मालदीव व्हेकेशनचा एक हॉट बिकनी घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप बोल्ड दिसत आहे. आपल्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या पूजा (Pooja Hegde)ने पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करणाऱ्या पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वत:चा बिकनीमधील फोटो शेअर केला आहे. पूजा सुंदर दिसत आहे आणि त्यात फिट दिसतेय. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, "मी नेहमी माझ्या सनशाईनला घेऊन चालते."

पूजाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टावर तिचे 17 मिलियन फॉलोअर्स आहेत. हा फोटो अपलोड होताच 12 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि अभिनेत्रीचे चाहते त्यावर जोरदार कमेंट करत आहेत. यामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राचा समावेश आहे. त्यावर मनीषने फायर इमोजीसह कमेंट केली आहे,  तर एका चाहत्याने लिहिले "पूजा, तू स्वतः सूर्यप्रकाश आहेस."

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर पूजा हेगडे 'राधे श्याम' या चित्रपटात प्रभाससोबत दिसणार आहे. हा चित्रपट रिलीजसाठी पूर्णपणे तयार आहे आणि 14 जानेवारी 2022 रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता, परंतु कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. अद्याप कोणतीही नवीन रिलीज डेट समोर आलेली नाही.

 

Web Title: Radhe shyam actress pooja hegde bikini look goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app