Question From Anil Kapoor that How Did Jackie Shroff Make It Through The Auditions? | जॅकी श्रॉफचा हा व्हिडिओ पाहून अनिल कपूरने चक्क विचारले, ऑडिशनमध्ये कोणी पास केले

जॅकी श्रॉफचा हा व्हिडिओ पाहून अनिल कपूरने चक्क विचारले, ऑडिशनमध्ये कोणी पास केले

ठळक मुद्देजॅकी या व्हिडिओत मनसोक्त झुम्बा डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत अनिलने विचारले आहे की, तुला ऑडिशनमध्ये पास कोणी केले.

जॅकी श्रॉफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला असून याच व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कारण या व्हिडिओत जॅकी श्रॉफ चक्क झुम्बा डान्स करताना दिसत आहे. 

राहुल द्रविडचा इंदिरा नगर का गुंडा ही जाहिरात सध्या चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. याच ब्रँडची नवी जाहिरात आली असून यात जॅकी श्रॉफ चक्क नृत्य करताना दिसत आहे. जॅकीने त्याच्या इन्स्टाग्रामला हा व्हिडिओ शेअर करत अतिरिक्त झुम्बा असे कॅप्शन लिहिले आहे. या व्हिडिओवर अतिशय मजेशीर कमेंट नेटिझन्स देत आहेत. आता अनिल कपूरने देखील या व्हिडिओवर एक कमेंट दिली असून ही कमेंट त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

जॅकी या व्हिडिओत मनसोक्त झुम्बा डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत अनिलने विचारले आहे की, तुला ऑडिशनमध्ये पास कोणी केले. अनिलच्या या रिप्लायची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून अनेकजण या कमेंटवर हसण्याचा इमोजी  पोस्ट करत आहे. 

जॅकीच्या या व्हिडिओवर त्याचे चाहते अनेक मजेदार कमेंट देत आहेत... दादा... छा गए असे कोणी म्हटले आहे तर काहींनी जॅकी श्रॉफला सुपरस्टार म्हटले आहे. एकाने तर अरे सगळे जॅकी म्हणाले तर मला वाटलं जॅकलिन असेल पण हा तर आपला भिडू निघाला अशी मजेशीर कमेंट दिली आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Question From Anil Kapoor that How Did Jackie Shroff Make It Through The Auditions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.