बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट आणि कृति खरबंदाचे रिलेशनशिपमध्ये कुणापासून लपून राहिलेले नाही.  पुलकित सम्राट कृति खरबंदाला डेट करतोय. दोघांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार पुलकित आणि कृति लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लवकरच पुलकित आणि कृतिचे कुटुंबीय एकमेकांची भेट घेणार आहेत. पुलकितच्या चुलत भावाच्या लग्नाचे आमंत्रण कृतिलासुद्धा देण्यात आले आहे. याच दरम्यान ही भेट होणार असल्याची चर्चा आहे. गोव्यात ही लग्न होणार आहे. रिपोर्टनुसार कृतिला भेटण्यासाठी पुलकितची फॅमिली खूपच उत्सुक आहे. त्यामुळे या लग्नादरम्यान दोघांच्या नात्याला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.  


 पुलकित सम्राटचे लग्न सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत झाले होते. पण लग्नानंतर काहीच महिन्यात त्याने तिला घटस्फोट दिला. या घटस्फोटाचे कारण यामी गौतम असल्याचे बोलले गेले होते. आता पुलकितच्या लाईफमध्ये कृतिची एंट्री झाली आहे.कृति आणि पुलकित वीरे की वेडिंग सिनेमात देखील एकत्र दिसले होते. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. 


कृतिने काही दिवसांपूर्वी पुलकितला डेट करत असल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. ती म्हणाली होती की, ‘ही अजिबात अफवा नाही. आम्ही दोघे एकमेकांना डेट करत आहोत. खरे सांगायचे तर मी कुणाला तरी डेट करतेय, हे सर्वप्रथम माझ्या पालकांना मला सांगायचे होते. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. सध्या मी हॅपी प्लेसमध्ये आहे. मी पुलकित सम्राटला डेट करतेय, हे सांगताना मला कुठलाही संकोच वाटत नाहीये.

Web Title: Pulkit samrat kriti will tie a knot with kharbanda gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.