priyanka chopra was trolled for wearing tricolour dupatta on 15 August | 15 ऑगस्टला देशभक्ती जाहीर करणे प्रियंका चोप्राच्या आलं अंगाशी, लोकांनी सुनावले होते खडेबोल

15 ऑगस्टला देशभक्ती जाहीर करणे प्रियंका चोप्राच्या आलं अंगाशी, लोकांनी सुनावले होते खडेबोल

प्रियंका चोप्रा हिने कित्येकदा जाहीर केले आहे की भलेही ती अमेरिकेत काम करत असली आणि आता अमेरिकन व्यक्तीची पत्नी असली तरी तिचे मन भारतातच आहे. ही भावना ती सोशल मीडिया अकाउंटवर जाहीर करते. पण एकदा तिला असे करणं अंगाशी आले होते आणि हे सगळे झाले होते तिच्या ओढणी आणि लूकमुळे.

खरेतर टीव्ही सीरिज क्वांटिकोच्या शूटसाठी प्रियंका 2017 साली अमेरिकेत राहत होती. अशात 15 ऑगस्ट आला. त्यावेळी तिने स्वातंत्र्य दिनाबद्दल आपल्या देशाबद्दलची भावना व्यक्त करीत सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता. या फोटोत प्रियंकाने डीप कट व्हाइट स्लीवलेस टॉप आणि हाय वेस्ट डेनिम जीन्स घातली होती. त्यासोबत तिने गळ्यात तिरंगी ओढणी गुंडाळली होती. तिने ही ओढणी हातात पकडून उडवताना दिसली होती. हा फोटो शेअर करत तिने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत तिचे मन भारतातच वसलेले आहे असे लिहिले होते.

तसे तर या फोटोत काहीच चुकीचे नव्हते. पण ट्रोलर्सने तिला खूप ट्रोल केले आणि एकानंतर एक तिच्या फोटोवर निगेटिव्ह कमेंट्स केल्या. प्रियंकाने झेंड्याच्या रंगाचा कपडा गळ्यात गुंडाळला होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिरंगाचा अपमान केल्याचे म्हटले आणि तिच्यावर खूप टीका केली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: priyanka chopra was trolled for wearing tricolour dupatta on 15 August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.