'मला काळी मांजर म्हणून हिणवायचे', ग्लोबल स्टार Priyanka Chopraने केली बॉलिवूडची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 11:26 AM2022-12-08T11:26:07+5:302022-12-08T11:40:33+5:30

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर देशातच नाही तर परदेशातही आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र तिला बॉलिवूडमध्ये रंगभेदचा सामना करावा लागला.

Priyanka Chopra reveals being called black cat dusky colourism in bollywood | 'मला काळी मांजर म्हणून हिणवायचे', ग्लोबल स्टार Priyanka Chopraने केली बॉलिवूडची पोलखोल

'मला काळी मांजर म्हणून हिणवायचे', ग्लोबल स्टार Priyanka Chopraने केली बॉलिवूडची पोलखोल

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत. देशात सुंदरता म्हटलं की गोऱ्या रंगाला महत्त्व दिले जाते. अशात बऱ्याचदा रंगभेदाबद्दल ऐकायला मिळते. नुकतेच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिला देखील बॉलिवूडमध्ये वर्ण भेदाचा सामना करावा लागला असा खुलासा केला आहे. प्रियंका चोप्राने बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येदेखील आपले स्थान निर्माण केले आहे. प्रियंकाने २००० साली मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता. प्रियांका चोप्रा आज ग्लोबल आयकॉन बनली आहे.  लोकप्रिय अभिनेत्री होण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. तिला त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. खूप मेहनत घ्यावी लागली.एका मुलाखतीत प्रियांका चोप्राने सांगितले आहे की सुरुवातीच्या काळात तिला  रंगामुळे भेदभावाचा सामना करावा लागला होता.

प्रियांकाने हिणवायचे काली बिल्ली
अलीकडेच प्रियांका चोप्राने बीबीसीच्या '100 महिलांच्या यादीत तिचं नाव सामील झाल आहे. ती 2022 मधील सर्वात प्रभावशाली महिला बनली आहे. प्रियांका चोप्राने बीबीसीशी बॉलीिवूड आणि त्यातल्या वर्णभेदाविषयी सांगितले. तो म्हणाली, 'मला काळी मांजर आणि सावळी म्हटले जायचे. 'सावळी' काय असतं? तेही अशा देशात जिथे प्रत्येकजण डस्की आहे. मला वाटायचं की मी सुंदर नाही. मला इतरांपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल असं मला वाटायचं, पण मला विश्वास होता की माझ्यापेक्षा रंगाने उजळ असलेल्या अभिनेत्यांपेक्षा मी अधिक प्रतिभावान आहे. 

ते पुढे म्हणाली, 'ब्रिटीश राजवटीला आजही शंभर वर्षे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे मला वाटतं की आपण अजूनही या गोष्टींशी स्वतःला जोडलेले आहे. पण हे आपल्या पिढीवर अवलंबून आहे, त्यांच्यात या गोष्टी बदलण्याची क्षमता आहे जेणेकरून येणारी पिढी फक्त गोऱ्या रंगाला चांगलं म्हणणे आपल्याकडून शिकू नये.

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर देशातच नाही तर परदेशातही आपले स्थान निर्माण केले आहे. बऱ्याचदा ती वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले मत ठामपणे मांडताना दिसते. प्रियंका Russo Brothers' Citadel या चित्रपटात दिसणार आहे, जो Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'मध्येही प्रियंका दिसणार आहे. त्याच्याशिवाय कतरिना कैफ आणि आलिया भट देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


 

Web Title: Priyanka Chopra reveals being called black cat dusky colourism in bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.