ठळक मुद्दे गेल्या काही वर्षांपासून प्रियंका हॉलिवूडमध्ये बिझी आहे. अलीकडे ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले.

प्रियंका चोप्राने केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडही गाजवले. आता प्रियंकाने आणखी एक उपलब्धी आपल्या नावे केली आहे. होय, इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड सेलिब्रिटी होण्याचा मान प्रियंकाच्या वाट्याला आला आहे. 
 इन्स्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीयांच्या यादीत प्रियंका दुस-या क्रमांकावर (पहिल्या क्रमांकावर विराट कोहली - 5.3 कोटी फॉलोअर्स) आहे. पण  बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत ती अव्वल आहे. इन्स्टाग्रामवर प्रियंकाचे 4.99 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. 


इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या यादीत प्रियंकाने दीपिका पादुकोणला मागे टाकले आहे. दीपिकाचे 4.42 फॉलोअर्स आहेत. पाठोपाठ आलिया भटचे 4.32 कोटी तर अक्षय कुमारचे 3.68 कोटी फॉलोअर्स आहेत. ऐकून आश्चर्य वाटेल पण प्रियंका एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करण्यासाठी तब्बल 1 कोटी 86 लाख रुपये घेते. 


प्रियंका सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. विशेषत: इन्स्टाग्रामवर ती सतत स्वत:चे नवनवे फोटो, सेल्फी पोस्ट करत असते. अमेरिकन गायक निक जोनाससोबत विवाह केल्यानंतर प्रियंकाच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे. त्याच्या सोबतच्या रोमॅन्टिक फोटोंनीही तिचे इन्स्टा अकाऊंट भरलेले आहे.


प्रियंका तिच्या फॅशन आणि ड्रेसिंग सेन्समुळे अधिक चर्चेत असते. अनेकदा यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नुकत्याच पार पडलेल्या ग्रॅमी अवार्ड सोहळ्यात प्रियंकाच्या ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. या सोहळ्यात प्रियंकाने डिप नेकलाईन ड्रेस परिधान केला होता. यावरून ती बरीच ट्रोलही झाली होती.


गेल्या काही वर्षांपासून प्रियंका हॉलिवूडमध्ये बिझी आहे. अलीकडे ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. सोनाली बोस दिग्दर्शित या सिनेमा फरहान अख्तर आणि जायरा वसीम मुख्य भूमिकेत होते.

Web Title: priyanka chopra is now the most number of followers on instagram bollywood celebrity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.