Priyanka Chopra and Nick Jonas welcome baby: Good News!! निक-प्रियांका झाले आई-बाबा... सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गोड बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 09:42 AM2022-01-22T09:42:08+5:302022-01-22T09:43:09+5:30

बॉलिवूडच्या 'देसी गर्ल'ने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सरोगसीद्वारे बाळाचं स्वागत केल्याचं सांगितलं.

Priyanka Chopra Nick Jonas welcome a baby via surrogacy declares on Instagram says we are overjoyed | Priyanka Chopra and Nick Jonas welcome baby: Good News!! निक-प्रियांका झाले आई-बाबा... सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गोड बातमी

Priyanka Chopra and Nick Jonas welcome baby: Good News!! निक-प्रियांका झाले आई-बाबा... सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गोड बातमी

Next

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा हिने आपल्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली. निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांच्या घरी सरोगसीच्या द्वारे बाळाचं आगमन झालं. निक-प्रियांका हे दोघे आई-बाबा झाल्याचं तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरून साऱ्यांना सांगितलं. "आम्ही सरोगसीद्वारे आमच्या घरात बाळाचे स्वागत केले आहे. ही बातमी साऱ्यांना सांगताना मला खूपच आनंद होतोय. या आनंदाच्या आणि खास क्षणांमध्ये आम्ही आमच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवणार आहोत. साऱ्यांचे धन्यवाद!", अशी पोस्ट प्रियांकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर केली आणि साऱ्यांना खुशखबर दिली.

--

प्रियांकाला काही दिवसांपूर्वीच फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी, आमच्या निक आणि माझ्या संसारात बाळाला एक विशेष असं स्थान आहे. आम्ही दोघांनी भविष्याचा विचार करून फॅमिली प्लॅनिंग केलं आहे, असं उत्तर तिने दिलं होतं. त्यानंतर शुक्रवारी मात्र तिने अचानक बाळाच्या आगमनाची घोषणा करून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला.

निक आणि प्रियांकाला अनेकदा बाळाच्या आगमनाबाबत जाहीरपणेही विचारण्यात आलं होतं. त्यावेळी दोघांनी प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला होता. निक आणि प्रियांका यांचं २०१८ साली लग्न झालं. हे त्यांचं पहिलं अपत्य आहे. प्रियांकाने आई झाल्याचं जाहीर करताच निक आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

Web Title: Priyanka Chopra Nick Jonas welcome a baby via surrogacy declares on Instagram says we are overjoyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app