ठळक मुद्देप्रेक्षकांच्या लाडक्या प्रियंका चोप्राने बॉलिवूडमधील सगळ्याच कलाकारांना मागे टाकले असून इंटरनेटवर सर्च केली गेलेली ती सेलिब्रेटी बनली आहे.

इंटरनेटवर सगळ्यात जास्त सर्च केली जाणारी अभिनेत्री ही काही वर्षांपूर्वी सनी लियोनी होती. पण आता सनी लियोनीला मागे टाकत प्रियंका इंटरनेटवर देखील टॉपची अभिनेत्री बनली आहे. प्रियंका चोप्रा गेल्या काही वर्षांपासून तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्याने ती बॉलिवूडपासून दूर होती. पण तिने गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या स्काय इज पिंक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये रिएंट्री केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी या चित्रपटातील प्रियंकाच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.

प्रियंका गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये खूपच कमी काम करत असली तरी आजही इंटरनेटवर कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रेटीपेक्षा ती अधिक लोकप्रिया आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या प्रियंका चोप्राने बॉलिवूडमधील सगळ्याच कलाकारांना मागे टाकले असून इंटरनेटवर सर्च केली गेलेली ती सेलिब्रेटी बनली आहे. इंडिया टिव्हीने दिलेल्या माहितीनुसार, SEMrush या कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार, ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत प्रियंका चोप्राचे नाव 27.4 करोड लोकांनी सर्च केले. या रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण दुसऱ्या क्रमांकावर तर तिसऱ्या क्रमांकावर सनी लियोनी आहे तर अभिनेत्यांमध्ये सलमान खानने बाजी मारली आहे. सलमान खानचे नाव 18 लाखांहून अधिक लोकांनी इंटरनेटवर सर्च केले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर शाहरुख खान आहे. 

या रिपोर्टमध्ये तिसऱ्या नंबरवर कोणता कलाकार आहे हे वाचल्यानंतर तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. हृतिक रोशन, शाहिद कपूर, रणबीर कपूर, रणवीर सिंग यांसारखे आजचे आघाडीचे नायक यात तिसऱ्या क्रमांकावर असतील असे तुम्हाला वाटले असेल ना... पण चक्क या यादीत दिवंगत अभिनते अमरिश पुरी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या नावाचा सर्च लोकांना मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर केला असल्याचे या सर्व्हेद्वारे दिसून आले आहे. 

Web Title: Priyanka Chopra is the most searched actress on internet, beats Sunny Leone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.