priyanka chopra has given treat to adinath kothare for pani movie got national award | 'पाणी'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर प्रियंका चोप्राने आदिनाथ कोठारेला दिली होती अशी ट्रीट
'पाणी'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर प्रियंका चोप्राने आदिनाथ कोठारेला दिली होती अशी ट्रीट

ठळक मुद्देमिनीकडून मी आदिनाथच्या रूमचा नंबर मागितला आणि आमच्या चित्रपटाला मिळालेल्या या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी काही गोष्टी पाठवून दिल्या होत्या. 

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात आदिनाथ कोठारेने दिग्दर्शित केलेल्या पाणी या चित्रपटाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला आहे. आदिनाथने पाणी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. पण त्याच्या या पहिल्याच चित्रपटाला चांगलेच यश मिळाले आहे. पाणी या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री प्रियंका चोप्राने केली असून पाणी या अतिशय महत्त्वाच्या विषयावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाली, त्यावेळी आदिनाथ त्याच्या ८३ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होता. राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर प्रियंकाने आदिनाथला खास ट्रीट दिली होती.

प्रियंकाने लोकमतला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आदिनाथचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. त्याच्या या पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या यशासाठी मी त्याला ट्रीट देण्याचे ठरवले. तो ८३ या चित्रपटाचे चित्रीकरण करत असल्याचे मला माहीत होते. या चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान असून त्याची पत्नी मिनी माथुर ही माझी चांगली मैत्रीण आहे. मिनीकडून मी आदिनाथच्या रूमचा नंबर मागितला आणि आमच्या चित्रपटाला मिळालेल्या या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी काही गोष्टी पाठवून दिल्या होत्या. 

आदिनाथला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने याविषयी सांगितले होते की, सध्या मी माझ्या ८३ या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून त्याचवेळी मला ही खूप चांगली बातमी मिळाली. मला शुभेच्छांचे खूप सारे मेसेज येत आहेत. माझ्या चित्रपटाला मिळालेल्या या यशासाठी मी प्रचंड खूश आहे.


Web Title: priyanka chopra has given treat to adinath kothare for pani movie got national award
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.