एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात. या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात.

 

मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. असंच काहीसं घडलं आहे पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्राबरोबर. तिने एका एव्हेंटमध्ये काळ्या रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता. पूर्ण वेळ ती हा ड्रेस सावरताना दिसली. त्यावेळी तिच्या बरोबर तिचा पती निक जोनास देखील होता. सगळे तिच्यासोबत असूनही प्रियंका चोप्रा मात्र नर्व्हस होती. तिच्या चेह-यावर नर्व्हस भाव उमटले होते.

 


 
अरे बापरे...! ड्रेसपेक्षा महगडा होता प्रियंकाचा बर्थडे केक, किंमत ऐकून तुम्हाला येईल चक्कर


 प्रियंकाने नुकताच ३७वा वाढदिवस साजरा केला. लग्नानंतरचा तिचा हा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे निक जोनासने या सेलिब्रेशनला ग्रॅण्ड बनवण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. बर्थ डे पार्टीत प्रियंका ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळाली. रेड ड्रेस आणि लिपस्टिक क्रिस्टल क्लचने प्रियंकाच्या लूकला चारचाँद लावले. प्रियंकासारखा रेड अँड गोल्ड बर्थडे केकदेखील खास होता. मात्र या केकची किंमत ऐकून तुम्हाला चक्कर येईल. मियामी बेस्ड डिवाइन डिलिशिएस केक्सने प्रियंकाच्या बर्थडेचा केक बनवला होता.

ही सर्व प्लानिंग निक जोनसची होती.डिवाइन डेलिशिएस केकच्या टीमजवळ ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कमी वेळ होता. केक बेक व्हायला, डेकोरेशन करायला आणि गोल्ड टच द्यायला पूर्ण २४ तास लागले. ५ टायरच्या चॉकलेट आणि वेनिला केकची किंमत कमी नव्हती. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार प्रियंकाच्या या केकची किंमत ३ लाख ४५ हजार रुपये इतकी होती.प्रियंकाचा हा बर्थडे केकची किंमत तिच्या रेड शिमरी आऊटफिटपेक्षा जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रियंकाच्या ड्रेसची किंमत ७८, ७९० रुपये इतकी होती.


Web Title: Priyanka Chopra Got Nervous In AN Event, Know The Reason Behind It
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.