बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने नुकताच ३७वा वाढदिवस साजरा केला. लग्नानंतरचा तिचा हा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे निक जोनासने या सेलिब्रेशनला ग्रॅण्ड बनवण्यात कोणतीही कसर ठेवली. बर्थ डे पार्टीत प्रियंका ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळाली. रेड ड्रेस आणि लिपस्टिक क्रिस्टल क्लचने प्रियंकाच्या लूकला चारचाँद लावले. प्रियंकासारखा रेड अँड गोल्ड बर्थडे केकदेखील खास होता. मात्र या केकची किंमत ऐकून तुम्हाला चक्कर येईल. 


मियामी बेस्ड डिवाइन डिलिशिएस केक्सने प्रियंकाच्या बर्थडेचा केक बनवला होता. ही सर्व प्लानिंग निक जोनसची होती. पिंकव्हिलाशी केलेल्या बातचीतमध्ये डिवाईन डिलिशिएस केकनं प्रियंकाच्या बर्थडे केकचे डिटेल्स सांगितले आहेत. डिवाइन डेलिशिएस केकच्या टीमजवळ ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कमी वेळ होता. केक बेक व्हायला, डेकोरेशन करायला आणि गोल्ड टच द्यायला पूर्ण २४ तास लागले. ५ टायरच्या चॉकलेट आणि वेनिला केकची किंमत कमी नव्हती. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार प्रियंकाच्या या केकची किंमत ३ लाख ४५ हजार रुपये इतकी होती.


प्रियंकाचा हा बर्थडे केकची किंमत तिच्या रेड शिमरी आऊटफिटपेक्षा जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रियंकाच्या ड्रेसची किंमत ७८, ७९० रुपये इतकी होती.


विशेष बाब म्हणजे प्रियंकाचा ड्रेस व केकहून जास्त महाग होता तिचा लिपस्टिक क्रिस्टल क्लच. रेड ड्रेससोबत तिने क्लच कॅरी केला होता. या क्लचची किंमत ३, ७८, १२४ रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातं.
पाहिलं तर प्रियंकाच्या बर्थ डे लूकची एकूण किंमत ४, ५६, ९५४ रुपये होती.

प्रियंकाच्या या ग्रॅण्ड बर्थ डे पार्टीमध्ये तिची आई व बहिण परिणीती चोप्रादेखील उपस्थित होती. 
 


Web Title: Priyanka's Birthday Cake was more expensive than a dress, you will be surprised to hear about the price
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.