प्राची देसाई 'सायलेन्स कॅन यू हियर इट'मधून करतेय कमबॅक, दिसणार वेगळ्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 10:55 AM2021-03-06T10:55:15+5:302021-03-06T10:55:42+5:30

लवकरच प्राची रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'सायलेन्स कॅन यू हियर इट' या सिनेमात ती झळकणार आहे.

Prachi Desai's comeback from 'Silence Can You Hear It' | प्राची देसाई 'सायलेन्स कॅन यू हियर इट'मधून करतेय कमबॅक, दिसणार वेगळ्या भूमिकेत

प्राची देसाई 'सायलेन्स कॅन यू हियर इट'मधून करतेय कमबॅक, दिसणार वेगळ्या भूमिकेत

googlenewsNext

टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्राची देसाई बऱ्याच मोठ्या कालावधीपासून बॉलिवूडपासून दुरावली आहे. मात्र आता लवकरच ती कमबॅक करणार आहे. लवकरच प्राची रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'सायलेन्स कॅन यू हियर इट' या सिनेमात झळकणार आहे. विशेष म्हणजे प्राची पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. 


 'सायलेन्स कॅन यू हियर इट' या सिनेमात प्राची पोलीस निरीक्षक संजनाची भूमिका साकारत अत्यंत धाडसी अशी ही भूमिका आहे. या सिनेमात मनोज बाजपेयी आणि अर्जुन माथुर यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २६ मार्च रोजी रिलीज होणार आहे. 


आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्राचीने सांगितले की,इन्स्पेक्टर संजनाला कोणत्याही गोष्टीत हार मानायची नसते. बेधडकपणे ती आलेल्या गोष्टींचा सामना करते. यापूर्वी मला चाहत्यांनी कधीही अशा प्रकारची भूमिका साकारताना पाहिले नव्हते त्यामुळे ही भूमिका पाहिल्यानंतर रसिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.


प्राची देसाईने २००६ मध्ये झी टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘कसम से’मधून टीव्ही पदार्पण केले. एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत प्राचीने बानीची भूमिका साकारली होती. ‘झलक दिखला जा’,‘सीआयडी’ या शो मध्येही ती झळकली होती. द कपिल शर्मा शो आणि नागीनमध्येही प्राची दिसली होती.


प्राचीने २००८ मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. फरहान अख्तरच्या ‘रॉक ऑन’मध्ये ती झळकली आणि यानंतर प्राचीने कधीही मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात तिने फरहानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर लाईफ पार्टनर, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, तेरी मेरी कहानी, बोल बच्चन, पुलिसगिरी, आय मी और मैं अशा अनेक चित्रपटांत ती दिसली.

Web Title: Prachi Desai's comeback from 'Silence Can You Hear It'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.