कोरोना वायरसपासून वाचण्यासाठी भारत सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. झपाट्याने पसरत असलेल्या या व्हायरसबाबत लोकांच्या मनात आता भिती निर्माण झाली आहे. यात बॉलिवूड कलाकारांनीही कोरोनाची धास्तीच घेतली आहे. यापासून कसे सुरक्षित राहता येइल यावर इतरांनाही सुचना देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

बॉलिवूड कलाकारांना कामानिमित्त देशाविदेशात फिरावेच लागते. शूटिंग आणि महत्त्वाची काम  टाळणे शक्य नसले तरीही स्वतःचे या संसर्गापासून कसा बचाव करता येईल याची खबरदारी घेताना दिसतायेत. एअरपोर्टवर सध्या कालाकार मास्क आणि हँडग्लब्ज घालून फिरताना दिसतायेत. यामुळे कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श झाला तरी त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होणार नाही.


कलाकारांना पाहिल्यावर चाहते गर्दी करतात त्यामुळे सेल्फी देण्यास  नकार देत असून  लांब कसे राहाता येईल याची काळजी घेत आहेत. प्रभास नुकताच एअरपोर्टवर स्पॉट झाला. चेह-यावर मास्क लावले असल्यामुळे चाहत्यांनीही त्याने ओळखले नाही.  

दीपिका पदुकोणही एका फॅशन वीकसाठी पॅरिसला जाणार होती.  मात्र कोरोनामुळेच दीपिकानं पॅरिस दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: From Prabhass to Hritik Roshan See How Bollywood Celebs safeguarding on their own from corona virus .

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.