Prabhas to reunite with Bhushan Kumar again after Radhe Shyam for Baahubali kind of film | खुशखबर! पुन्हा थिएटर्समध्ये होणार धमाका, सुपरस्टार प्रभास 'बाहुबली ३' च्या तयारीत?

खुशखबर! पुन्हा थिएटर्समध्ये होणार धमाका, सुपरस्टार प्रभास 'बाहुबली ३' च्या तयारीत?

बाहुबली स्टार प्रभासने केवळ साऊथमधील नाही तर आता जगभरातील लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. दिवसेंदिवस त्याचे फॅन फॉलोअर्स वाढत आहेत. हेच कारण आहे की, त्याला बॉलिवूडमधून अनेक सिनेमे ऑफर होत आहेत. इतकेच नाही तर त्याचे साउथमधील सिनेमेही हिंदी व्हर्जनमध्ये रिलीज करण्याची तयारी केली जात आहे. प्रभासच्या 'साहो' बाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ होती. त्यानंतर आता त्याचे फॅन त्याच्या आगामी 'राधे श्याम' सिनेमासाठी उत्सुक आहे. या सिनेमाचं शूटींग सुरू आहे. 

अशात आता अशीही बातमी समोर येत आहे की, प्रभासला पुन्हा एकदा भूषण कुमार आपल्या पुढील सिनेमात कास्ट करण्याच्या तयारी आहे. टी सीरीजचा मालक भूषण कुमार पुढील सिनेमा बाहुबलीसारखा करण्याच्या तयारीत आहे. ही एक पौराणिक कथा असेल. महत्वाची बाब म्हणजे या सिनेमासाठी प्रभासने होकार दिल्याचं समजतं. प्रभासला या सिनेमाचं कथानक आवडल्याचं समजतं. त्यानंतर भूषण कुमारला हा सिनेमा लार्ज स्केलवर करायचा आहे. 

बॉलिवूड लाइफ डॉट कॉमला सिनेमाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, 'प्रभासला भारतीय लोककथेवर आधारित एका सिनेमाची ऑफर देण्यात आली आहे. हा सिनेमा पौराणिक कथेवर बेस्ड आहे. भूषण कुमार हा सिनेमा मोठ्या स्केलवर करण्याच्या तयारीत आहे. हा एक अॅक्शन पॅक्ड फॅमिली ड्रामा आहे. ज्यात भारतीय इतिहास आणि पौराणिक कथेची झलक बघायला मिळेल. जेव्हा भूषणने प्रभासला या सिनेमाबाबत सांगितले तर त्याला हा विचार आवडला. कारण हा सिनेमा बाहुबलीसारखा मोठ्या स्केलवर तयार केला जाणार आहे'.

हे पण वाचा :

...माझ्यावरही बलात्कार झाला असता, राधिका आपटेचा धक्कादायक खुलासा

करेंगे सबकी छुट्टी...! हे साऊथ सुपरस्टार उडवणार अक्षय, सलमान, अजय देवगणची झोप

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Prabhas to reunite with Bhushan Kumar again after Radhe Shyam for Baahubali kind of film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.