Prabhas 41 birthday : Australian player David Warner in the dress of baahubali to wish the actor | Bday Special : प्रभासला शुभेच्छा देण्यासाठी 'बाहुबली' बनला डेविड वॉर्नर, व्हिडीओ व्हायरल

Bday Special : प्रभासला शुभेच्छा देण्यासाठी 'बाहुबली' बनला डेविड वॉर्नर, व्हिडीओ व्हायरल

आज म्हणजेच २३ ऑक्टोबरला 'बाहुबली' स्टार प्रभास आपला ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला त्याच्या फॅन्स, को-स्टार्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भरभरून शुभे्च्छा दिल्या. इतकेच काय तर तिला ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आणि आयपीएल सनरायजर्स हैद्राबादचा टीमचा कर्णधार डेविड वॉर्नर यानेही अनोख्या स्टाइलने शुभेच्छा दिल्या. प्रभासला शुभेच्छा देणारा डेविड वॉर्नरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रभासला शुभेच्छा देण्यासाठी स्वत: डेविड वॉर्नर 'बाहुबली' बनला. त्याचा हे अनोखं रूप सनरायजर्स हैद्राबाद टीमने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलंय. हैद्राबाद टीमने व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रभास'. (SEE PICS: ‘बाहुबली’ प्रभास आहे इतक्या कोटींचा मालक, असे जगतो लक्झरी लाईफ)

या व्हिडीओत वॉर्नर बाहुबील सिनेमातील एक डायलॉग म्हणताना दिसतोय. तर त्याची त्याच्यासमोरील सर्वसामान्य जनता बनली आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताच व्हायरल झाला आहे. व्हिडीओला २ हजारांपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. सर्वच प्लॅटफॉर्मबाबत सांगायचं तर व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. 

लोक डेविड वॉर्नरची क्रिएटीव्हिटी पाहून अवाक् झाले आहेत. जर प्रभासच्या वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर प्रभास आणि पूजा हेगडेच्या आगामी 'राधे-श्याम' सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. तसेच तो दीपिकासोबतच्या सिनेमाची आणि 'आदिपुरूष' सिनेमाचीही तयारी करतो आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Prabhas 41 birthday : Australian player David Warner in the dress of baahubali to wish the actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.