रिचा चड्ढा आणि रोनित रॉयच्या 'कँडी'चा दमदार ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 06:46 PM2021-08-31T18:46:04+5:302021-08-31T18:46:31+5:30

रिचा चड्ढा आणि रोनित रॉय कँडी वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Powerful trailer release of Richa Chadha and Ronit Roy's 'Candy' | रिचा चड्ढा आणि रोनित रॉयच्या 'कँडी'चा दमदार ट्रेलर रिलीज

रिचा चड्ढा आणि रोनित रॉयच्या 'कँडी'चा दमदार ट्रेलर रिलीज

Next

अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता रोनित रॉयची आगामी वेबसीरिज कँडीचे कथानक राजकारण, महत्त्वाकांक्षा, खून, रहस्य आणि इतर अनेक गोष्टींभोवती फिरते. रिचा चढ्ढा आणि रोनित रॉय प्रमुख भूमिकेत असलेल्या कँडीमध्ये प्रेक्षकांना रूद्रकुंडमधील पापे उघडकीस आणण्यासाठी रोमांचकारी प्रवास या सीरिजमध्ये पहायला मिळेल. ट्रेलर अत्यंत उत्कंठावर्धक, कुतूहल निर्माण करणारा, खिळवून ठेवणारा, लोकांचे लक्ष वेधणारा आणि असंख्य ट्विस्ट्सनी भरलेला आहे. आशिष आर. शुक्ला यांचे दिग्दर्शन असलेली ‘कँडी’ ही मालिका आपले दिग्गज कलाकार आणि रोनित रॉय आणि रिचा चढ्ढा यांच्या शक्तिशाली सादरीकरणाद्वारे प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल.

पर्वतांमधील अत्यंत देखण्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कँडी शोमधून अनेक रहस्ये उलगडतील आणि पापे समोर येतील. हे कथानक लोकांना आ वासायला लावेल. ते सस्पेन्स, राजकारण, महत्त्वाकांक्षा, भीती, आशा आणि इतर अनेक गोष्टींसोबत खुनाच्या रहस्याशी जोडलेले आहे.


या मर्डर मिस्ट्रीची निर्मिती ऑप्टिमिस्टिक एंटरटेनमेंटने केली असून हा शो मनोरंजक ठरेल, कारण त्यातून प्रेक्षकांना रहस्य उलगडण्याची आतुरता लागेल. फक्त एवढेच नाही तर रिचा चढ्ढा, रोनित रॉय आणि इतर कलाकारांची सादरीकरणे फक्त शक्तिशालीच नाहीत तर ती तुम्हाला शोसोबत खिळवून ठेवतील. हा ट्रेलर शोला रोमहर्षक कथानक जोडणाऱ्या दिग्दर्शकाकडून तुम्हाला दिलेली एक मेजवानी आहे. कथानकापासून कलाकारांपर्यंत ट्रेलरमधील प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांसाठी उत्कंठा वाढवणारी आहे.


रिचा चढ्ढा म्हणाली की, मला माझ्या व्यक्तिरेखा आणि भूमिकांमध्ये प्रयोग करायला नेहमीच आवडले आहे. वूट सिलेक्टच्या कॅन्डी सोबत एका वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखेसोबत पोलिसाची भूमिका बजावण्याची मला आणखी एक संधी मिळणार आहे. एका धमाकेदार पोलिसाची भूमिका करणे माझ्यासाठी कायम आव्हानात्मक होते. रूद्रकुंडच्या डीएसपी रत्ना ही पापे कशा प्रकारे उलगडतात ते पाहायला सज्ज राहा.

रोनित रॉय म्हणाला की, कँडीचे कथानक जिथे घडते, ती जागा अत्यंत रोमहर्षक आणि आकर्षक आहे. ही  प्रचंड रहस्य, भीती, आशा आणि संशय यांनी भरगच्च असलेली कथा आहे. हा शो बघताना प्रेक्षकांची उत्कंठा नक्कीच वाढेल अशी मला खात्री आहे. मला अनेक बुद्धिमान कलाकारांसोबत आणि दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. हा शो वेगळा नाही. आमच्या कलात्मक प्रमुख आणि दिग्दर्शक आशिष शुक्ला यांनी प्रत्येक व्यक्तिरेखा अचूक आणि रहस्यमयी बनवली आहे. मला इतक्या छुप्या व्यक्तिरेखेची भूमिका करण्याची संधी प्रथमच मिळाली आहे. मी ही भूमिका करण्यासाठी खूप उत्सुक आहे. पाहत राहा कारण ही मालिका पापांचा पर्दाफाश करणार आहे.

Web Title: Powerful trailer release of Richa Chadha and Ronit Roy's 'Candy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app