Poonam Pandey: 'राज कुंद्रानं माझा नंबर अ‍ॅपवर लिक करुन अश्लिल मेसेज केला', पूनम पांडेचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 08:12 PM2021-07-22T20:12:43+5:302021-07-22T20:13:32+5:30

Poonam Pandey alleged Raj Kundra: "राज कुंद्राच्या कंपनीसोबत करार संपुष्टात आणल्यामुळे त्यानं माझ्याविरोधातील राग बाहेर काढण्यासाठी माझा वैयक्तिक मोबाइल नंबर अ‍ॅपवर प्रसिद्ध केला"

Poonam Pandey Accuses Raj Kundra Of Leaking Her Number With A Message i will Strip For You | Poonam Pandey: 'राज कुंद्रानं माझा नंबर अ‍ॅपवर लिक करुन अश्लिल मेसेज केला', पूनम पांडेचा खळबळजनक आरोप

Poonam Pandey: 'राज कुंद्रानं माझा नंबर अ‍ॅपवर लिक करुन अश्लिल मेसेज केला', पूनम पांडेचा खळबळजनक आरोप

Next

Poonam Pandey alleged Raj Kundra: पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक झाल्यानंतर या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. राज कुंद्रावर याआधी देखील मॉडेल पूनम पांडे हिनं हायकोर्टाची पायरी चढली होती. पण आता कुंद्राच्या अटकेनंतर पूनम पांडेनं केलेल्या आरोपांबाबत अधिक माहिती आता समोर येऊ लागली आहे. 

शर्लिन चोपडा अन् पूनम पांडेसोबत राज कुंद्रानं केलेला करार; इतक्या नफ्याची झालेली डील

"राज कुंद्राच्या कंपनीसोबत करार संपुष्टात आणल्यामुळे त्यानं माझ्याविरोधातील राग बाहेर काढण्यासाठी माझा वैयक्तिक मोबाइल नंबर अ‍ॅपवर प्रसिद्ध करुन 'मला फोन करा मी तुमच्यासाठी स्ट्रिप करायला तयार आहे', असा मेसेज प्रसिद्ध केला होता", असा खळबळजनक दावा पूनम पांडे हिनं आपल्या याचिकेत केल्याचं समोर आलं आहे. (Poonam Pandey Accuses Raj Kundra Of Leaking Her Number With A Message 'I'll Strip For You')

Poonam Pandey ने Raj Kundra वर लावले होते गंभीर आरोप, म्हणाली - माझ्या फोटो-व्हिडीओसोबत...

"मला शूटिंग करायचं आहे आणि यात तुमच्या सर्व अटी व शर्ती मला मान्य असतील अशा करारावर सही करण्यासाठी माझ्यावर बळजबरी करण्यात आली आणि मला धमकावण्यातही आलं. मी सही करण्यासाठी तयार नसल्याचं कळताच त्यांनी माझा मोबाइल नंबर त्यांच्या अ‍ॅपवर प्रसिद्ध केला. त्यात मला आता फोन करा मी तुमच्यासाठी हवं ते करायला तयार आहे असा संदेश प्रसिद्ध करण्यात आला होता. याचा मला खूप त्रास झाला", असं पूनम पांडे हिनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पूनम पांडेची धाव, केले गंभीर आरोप

राज कुंद्राच्या मालकीच्या अ‍ॅपवर माझा मोबाइल नंबर प्रसिद्ध झाल्यानंतर मला अनोळखी माणसांचे फोन कॉल येऊ लागले. अवेळी येणाऱ्या फोन कॉल्सनं मी वैतागले होते. इतकंच नव्हे, तर माझ्यासोबत काहीतरी वाईट घडेल या भीतीनं मी माझं राहतं घरही सोडलं होतं, असंही पूनम पांडे हिनं म्हटलं होतं. 

याशिवाय, पूनम पांडे हिनं इतर पीडित मुलींनी देखील पुढे येऊन त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती जाहीर करावी, असं आवाहन केलं आहे. "तुम्ही विचार करा मला समाजमाध्यमांमध्ये अनेक लोक ओळखतात. माझ्यासोबत जर असं घडलं असेल तर या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहणाऱ्या नवख्या मुलींसोबत काय काय घडलं असेल. हे कधी आणि कसं थांबणार आहे? हे मला माहित नाही. पण ज्या ज्या मुलींसोबत वाईट घडलं आहे त्यांनी समोर येऊन बोलायला हवं असं आवाहन मी करते", असं पूनम पांडे म्हणाली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Poonam Pandey Accuses Raj Kundra Of Leaking Her Number With A Message i will Strip For You

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app